बीड: गहुखेल येथे शेतात विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू

हौसाबाई प्रल्हाद साखरे यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.
हौसाबाई प्रल्हाद साखरे यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.

आष्टी, पुढारी वृत्तसेवा:  गहुखेल (ता. आष्टी) येथे वादळी पावसात कोसळलेल्या विजेच्या खांबाच्या विद्युत वाहिनीचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.१८) सायंकाळी घडली. हौसाबाई प्रल्हाद साखरे (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे महावितरणाच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसात गहुखेल येथील शेतातील विद्युत खांब उन्मळून पडला होता. महावितरणने खांब तसाच ठेवला होता. शिवाय विद्युत प्रवाह देखील बंद केला नव्हता. त्यामुळे महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतात कामासाठी गेलेल्या महिलेचा विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला.

मृत महिलेच्या मागे  पती, २ विवाहित मुली असा परिवार आहे. मृत महिलेच्या कुटुंबाला  आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी गहुखेल ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news