India vs New Zealand, 2nd Test : मयांक अग्रवालचे झुंजार शतक | पुढारी

India vs New Zealand, 2nd Test : मयांक अग्रवालचे झुंजार शतक

मुंबई : पुढारी ऑनलाईन

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याला दुपारी १२ वाजता सुरुवात झाल्यानंतर मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात करून दिली. त्यांनी ८० धावांची सलामी दिली.

मात्र, त्यानंतर भारताचा डाव कोलमडला. जम बसलेला शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली सलग बाद झाले. कोहली आणि पुजाराला एजाज पटेलने एकाच षटकात बाद करत भारतीय डावाला खिंडार पाडले.

त्यानंतर पहिल्या सामन्यातील हिरो ठरलेला श्रेयस अय्यरही १८ धावांवर परतल्याने भारताची अवस्था ४ बाद १६० अशी झाली. दुसऱ्या बाजूने मयंकने किल्ला लढवताना शानदार शतक झळकावले.

  • India vs New Zealand, 2nd Test Live update 
  • भारताच्या ६० षटकांत ४ बाद १९८ धावा
  • मयंकचे दमदार शतक
  • भारताच्या ५२ षटकांत ४ बाद  १६४ धावा
  • श्रेयस अय्यर १८ धावा करून बाद
  • मयंक अग्रवालचे अर्धशतक
  • दमदार सुरुवातीनंतर भारताला एकमागून एक तीन धक्के, विराट कोहली शुन्यावर आउट
  • भारताला पहिला धक्का. शुभमन गिल ४४ धावा करून झेलबाद
  • मयांक, शुभमनची अर्धशतकी भागीदारी
  • सलामीला मयांक अग्रवाल आणि शुभमन गिल मैदान
  • नाणेफेक जिंकून टीम इंडियाचा फलंदाजीचा निर्णय

Back to top button