‘KKR’च्‍या सुनील नरेनचा नवा विक्रम, आर अश्‍विनला टाकले पिछाडीवर | पुढारी

'KKR'च्‍या सुनील नरेनचा नवा विक्रम, आर अश्‍विनला टाकले पिछाडीवर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : वेस्‍ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील अष्‍टपैलू खेळाडू सुनील नरेन यानें आपल्‍या नावावर नवा विक्रम केला आहे. IPL मध्ये सर्वाधिक बळी घेणारा पाचवा खेळाडू बनला आहे. शुक्रवार, २६ एप्रिल रोजी ईडन गार्डन्सवर पंजाब किंग्ज (पीबीकेएस) विरुद्ध केकेआरच्या सामन्यात त्‍याने ही कामगिरी केली. नरेनने चार षटकांमध्‍ये २४ धावा दिल्‍या. या सामन्‍यातील १३व्या षटकात रिली रॉसौला बाद करून त्‍याने आर. अश्‍विनला पिछाडीवर टाकले आहे.

सुनील नरेन याने आतापर्यंत 6.74च्या इकॉनॉमी रेटने 170 सामने आणि 169 डाव खेळून IPL मध्ये 173 विकेट्स मिळवल्या आहेत. तर टीम इंडियाचा फिरकीपटू अश्विनने 204 सामने आणि 201 डावात खेळून 172 विकेट्स घेतल्या आहेत.

युजवेंद्र चहल IPL मध्‍ये ठरला सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज

युजवेंद्र चहल हा आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. 153 सामन्यांमध्ये चहलने 21.37 च्या सरासरीने 200 बळी घेतले आहेत, यामध्‍ये ४० धावांमध्‍ये ५ बळी हा  सर्वोत्तम आकडा आहे. त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीमध्‍ये आतापर्यंत सहावेळा चार विकेट्स आणि पाच विकेट्स घेतल्या आहेत.

पंजाब विरुद्‍ केकेआर सामन्‍यात अनेक विकमांची नोंद

पीबीकेएस आणि केकेआर यांच्यात शुक्रवारी सामनात झाला. पंजाबने नाणेफेक जिंकून कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रीत केली. यानंतर सुनील नरेन (71) आणि फिलिप सॉल्ट (75) यांनी दमदार फलंदाजी प्रदर्शनासह ईडन गार्डन्सच्या प्रेक्षकांना आनंदित केले आणि पंजाब किंग्ज (पीबीकेएस) च्या गोलंदाजांनी केकेआरला 20 षटकांत 261/6 पर्यंत नेले.
अर्शदीप सिंगने दोन बळी घेतल्यानंतर पीबीकेएस गोलंदाजी युनिटचे नेतृत्व केले.

धावांचा पाठलाग करताना, जॉनी बेअरस्टो (108) आणि शशांक सिंग (68) यांनी नाबाद खेळी खेळून मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला.
केकेआरकडून नरेनने एकमेव विकेट घेतली.आठ सामन्यांपैकी, KKR ने पाच विजयांची नोंद केली आहे, IPL 2024 च्या क्रमवारीत 10 गुण जमा केले असून, गुणतालिकेत हा संघ दुसर्‍या क्रमाकांवर दिसेल. दरम्यान, पंजाबने नऊपैकी तीन गेम जिंकून सहा गुणांसह आठव्या स्थानावर आहे. (ANI)

हेही वाचा : 

Back to top button