Stock Market Updates | बाजारात संदिग्धता! सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला, BSE मिडकॅप, ‘स्मॉलकॅप’लाही फटका

Sensex
Sensex

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीदरम्यान भारतीय शेअर बाजारात संदिग्धता वाढत आहे. आज गुरुवारी (दि.९) बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह खुले झाले. सकाळच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स तब्बल ५०० अंकांनी घसरून ७३ हजारांच्या खाली आला. तर निफ्टी सुमारे १५० अंकांच्या घसरणीसह २२,१५० वर व्यवहार करत आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टी गेल्या चार सत्रांपासून कमकुवत पातळीवर व्यवहार करत आहेत. ते सर्वकालीन उच्चांकावरून घसरले आहेत. ऑईल आणि गॅस आणि बांधकाम कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. तर ऑटोमोबाईल कंपन्यांचे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. बीएसई मिडकॅप ०.७ टक्के आणि स्मॉलकॅप ०.९ टक्क्यांनी खाली आला.

दरम्यान, काल बाजाराने घसरणीतून सावरण्याचा प्रयत्न केला, पण सपाट पातळीवर बंद झाला.

सेन्सेक्सवर एलटी, जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्रा, टीसीएस, रिलायन्स, आयटीसी, विप्रो हे शेअर्स घसरले आहेत. एम अँड एम, टाटा मोटर्स, एचसीएल टेक, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत.

निफ्टीवर एलटी, डिव्हिस लॅब, कोल इंडिया, ओएनजीसी, बीपीसीएल हे शेअर्स सर्वाधिक घसरले आहेत. तर हिरो मोटोकॉर्प, एम अँड एम, बजाज ऑटो हे शेअर्स वधारले आहेत.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news