DC vs RR : राजस्थानचे दिल्लीला विजयासाठी 186 धावांचे लक्ष्य | पुढारी

DC vs RR : राजस्थानचे दिल्लीला विजयासाठी 186 धावांचे लक्ष्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2024 चा नववा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होत आहे. सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सामन्यात प्रथम फलंदाजीत रियान परागने केलेल्या नाबाद 83 धावांच्या जोरावर राजस्थानने आपल्या डावात 185 धावा केल्या. त्याचा या खेळीमुळे दिल्लीपुढे विजसासाठी 186 धावांचे लक्ष्य आहे. रियानने आपल्या खेळीत 45 बॉलमध्ये 7 चौकार आणि 6 षटकाप लगावून 83 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावप राजस्थानने दिल्लीला विजयसाठी 186 धावांचे आव्हान दिले आहे.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकात 5 गडी गमावून 185 धावा केल्या. सामन्यात संजू सॅमसन फलंदाजी करताना संघर्ष करताना दिसला. अवघ्या नऊ धावांवर संघाला पहिला धक्का बसला. यशस्वी जैस्वाल केवळ पाच धावा करून तंबूत परतला. राजस्थानने 36 धावांवर तीन विकेट गमावल्या.

संघाला दुसरा धक्का जोस बटलरच्या रूपाने बसला तो केवळ 11 धावा करू शकला तर संजू सॅमसन 15 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर रविचंद्रन अश्विन पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने रियान परागसोबत चौथ्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. अश्विनने या सामन्यात 19 चेंडूंचा सामना करत 29 धावा केल्या. यानंतर ध्रुव जुरेलनेही 20 धावांची जलद खेळी केली. त्याने 12 चेंडूंचा सामना करत तीन चौकार मारले. शिमरॉन हेटमायर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने रियान परागसोबत 43 धावांची नाबाद भागीदारी केली. या सामन्यात हेटमायरने 14 धावा केल्यानंतर नाबाद राहिला.

तर रियान परागच्या झंझावाती खेळीमुळे राजस्थानची धावसंख्या 180 च्या पुढे गेली. त्याने 45 चेंडूंचा सामना करत सात चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद 84 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात त्याने शिमरॉन हेटमायरला लक्ष्य करत 25 धावा कुटल्या. दिल्लीकडून खलील अहमद, मुकेश कुमार, एनरिच नोरखिया, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

संघ :

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन) : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार.

दिल्ली कॅपिटल्स इम्पॅक्ट प्लेयर : अभिषेक पोरेल, जेक फ्रेझर-मॅकगुर्क, प्रवीण दुबे, कुमार कुशगरा, रसिक दार.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन) : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, आवेश खान.

राजस्थान रॉयल्स इम्पॅक्ट प्लेयर : रोविमन पोयल, आंद्रे बर्गर, तनुष खाटियान, शुभम दुबे, कुलदीप सेन.

हेही वाचा :

Back to top button