Dhananjay Singh : जौनपूरचे माजी खासदार धनंजय सिंह यांना जामीन मंजूर | पुढारी

Dhananjay Singh : जौनपूरचे माजी खासदार धनंजय सिंह यांना जामीन मंजूर

पुढारी ऑनलाईन डेस्क: जौनपूरचे माजी खासदार धनंजय सिंह यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने आज (दि.२७) दुपारी बाराच्या सुमारास जामीन मंजूर केला. परंतु, त्यांना जामीन मंजूर केला असला तरी, त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे त्यांना आता निवडणूक लढवता येणार नाही. याप्रकरणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय कुमार सिंह यांच्या एकल खंडपीठाने हा निकाल दिला आहे. Dhananjay Singh

अपहरण आणि खंडणीच्या एका हायप्रोफाईल प्रकरणात धनंजय सिंह यांना जौनपूरच्या विशेष न्यायालयाने ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानिकालाविरोधात त्यांनी गेल्या महिन्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने २५ एप्रिल रोजी निकाल राखून ठेवला होता. आज न्यायालयाने या प्रकरणी निकाल देत त्यांना जामीन मंजूर केला आहे. मात्र, शिक्षेला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. Dhananjay Singh

Dhananjay Singh  काय प्रकरण होते

धनंजय सिंह यांना अपहरण प्रकरणात सात वर्षांची शिक्षा झाली होती. त्यानंतर त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात अपील दाखल करून ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान धनंजय यांच्या वकिलांनी राजकीय षड्यंत्राचा बळी असल्याचे म्हटले होते.

आज सकाळी त्यांना जौनपूर तुरुंगातून बरेली तुरुंगात हलवण्यात आले होते. यावेळी धनंजय सिंह यांच्या पत्नी श्रीकला रेड्डी हजर होत्या. श्रीकला जौनपूरमधून बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर सपाकडून बाबू सिंह कुशवाह आणि भाजपकडून कृपाशंकर सिंह निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचा 

Back to top button