IND vs ENG, 2nd Test Day 4 : भारताचा १०६ धावांनी विजय | पुढारी

IND vs ENG, 2nd Test Day 4 : भारताचा १०६ धावांनी विजय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : IND vs ENG, 2nd Test Day 4 : विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लडचा १०६ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पुनरागमन करत १-१ अशी बरोबरी साधली आहे. पहिली कसोटी इंग्लडने २८ धावांनी जिंकली. तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवली जाणार आहे.

भारताने इंग्लंडसमोर ३९९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा दुसरा डाव २९२ धावांवर आटोपला. यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २५३ धावा करून सर्वबाद झाला. भारताला पहिल्या डावात १४३ धावांची आघाडी मिळाली होती. गिलच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या डावात २५५ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर ३९९ धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर भारताने इंग्लडला २९२ धावांत गुंडाळून सामना जिंकला.

इंग्लंडने नऊ विकेट गमावल्या

इंग्लंडने नऊ विकेट गमावल्या असून भारतीय संघ विजयापासून फक्त एक विकेट दूर आहे. इंग्लंडला २८१ धावांवर नववा धक्का बसला. बशीरला मुकेशने यष्टिरक्षक भरतच्या हाती झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही.

इंग्लंडला आठवा धक्का

इंग्लंडला २७५ धावांवर आठवा धक्का बसला. जसप्रीत बुमराहने त्याच्याच चेंडूवर बेन फॉक्सचा झेल घेतला. फॉक्सने ६९ चेंडूत ३६ धावांची खेळी खेळली. त्याने टॉम हार्टलीसोबत ५५ धावांची भागीदारी केली. सध्या हार्टली आणि शोएब बशीर क्रीजवर आहेत.

बेन फॉक्स आणि टॉम हार्टले यांची ५० धावांची भागीदारी

आठव्‍या विकेटसाठी बेन फॉक्‍स आणि टॉम हार्टले यांनी ५० धावांची भागीदारी पूर्ण केली आहे. हार्टले ३० वर तर फॉक्‍स ३१ धावांवर खेळत आहे. इंग्‍लंडला विजयासाठी १२८ धावांची गरज आहे तर भारताला ३ विकेटसची आवश्‍यकता आहे.

श्रेयसचा अचूक थ्राे, बेन स्‍टाेक्‍सची दांडी गूल

इंग्लंडने सहा गडी गमावत २०० धावांचा टप्‍पा पूर्ण केला. बेन फॉक्स आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी डाव सावरला असे वाटत असतानाच २२० धावांवर श्रेयस अय्‍यरच्‍या अप्रतिम थ्राेवर  बेन स्‍टाेक्‍स धावबाद झाला. 

 क्राॅलीने केला डाव सावरण्‍याचा प्रयत्‍न, इंग्‍लंडला सलग दाेन धक्‍के

अर्धशतकानंतर क्रॉलीने आपली आक्रमक फलंदाजी कायम ठेवली. त्‍याला जॉनी बेअरस्‍टोची साथ लाभली होती. मात्र ४२ व्‍या षटकात फिरकीपटू कुलदीप यादवने क्रॉलीला यष्‍टीचीत केले. यानंतर पुढच्‍या षटकामध्‍ये जसप्रीत बुमराहने बेअरस्‍टोला यष्‍टीचीत केले. लंचपूर्वी इंग्‍लंडला १९६ धावांवर सहावा धक्‍का बसला. आता दुसर्‍या कसोटीत विजय मिळण्‍यापासून टीम इंडिया केवळ चार पावले दूर आहे.

अश्‍विनचा डबल धमाका

इंग्‍लंडला १३२ धावांवर तिसरा झटका बसला. पहिल्‍या कसोटी सामन्‍यातील विजयाचा शिल्‍पकार ठरलेला ओली पोप याला फिरकीपटू अश्‍विनने रोहितकरवी झेलबाद केले. रोहितने स्लिपमध्ये उत्कृष्ट झेल घेतला. ओलीने २१ चेंडूत २३ धावा केल्‍या. क्रॉलीने अर्धशतक झळकावले आहे, इंग्लंडला विजयासाठी२५० धावांची तर भारताला ७ विकेट हव्‍या आहेत. अश्‍विनने इंग्‍लंडला सलग दुसरा धक्‍का दिला. त्‍याने जो रूटला अक्षरकरवी झेलबाद केले. रूटने १६ धावा केल्‍या. १५४ धावांवर इंग्‍लंडने चौथी विकेट गमावली.

IND vs ENG, 2nd Test Day 4 : इंग्‍लंडला अक्षर पटेलने दिला दुसरा धक्‍का

इंग्‍लंडने चाैथ्‍या दिवसाची सुरुवात आश्‍वासक केली हाेती. नाईट वाॉचमन रेहान अहमद आणि क्रॉली याने फटकेबाजी करत इंग्‍लंडचा धाव फलक हालता ठेवला. मात्र ९५ धावांवर इंग्‍लंडला दुसरा धक्‍का बसला. फिरकीपटू अक्षर पटेल याने रेहनला यष्‍टीचीत केले. त्‍याने ३१ चेंडूत २३ धावा केल्‍या.

कुलदीपने डकेटला धाडले तंबूत

सामन्‍याच्‍या तिसर्‍या दिवशी दुसर्‍या डावाची सुरुवात इंग्‍लंडने दमदार केली. विनाबाद फलकावर अर्धशतकही झळकावले. मात्र ११ व्‍या षटकात आर. अश्‍विनने इंग्‍लंडला पहिला धक्‍का दिला. अश्‍विनच्‍या फिरकीवर फसलेल्‍या इंग्‍लडचा सलामीवीर डकेट याचा यष्‍टीरक्षक श्रीकर भारत याने अप्रतिम झेल टिपला. डकेट याने २७ चेंडूत ६ चौकारांच्‍या मदतीने २८ धावा केल्‍या.

भारताला विजयासाठी हव्‍यात ९ विकेट तर इंग्‍लंडसमाेर 399 धावांचे लक्ष्य

यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 396 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ 253 धावा करू शकला आणि भारताला पहिल्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात गिलच्या शतकामुळे भारताने 255 धावा केल्या असून इंग्लंडसमोर विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य आहे. (IND vs ENG, 2nd Test Day 3)

इंग्‍लंडचा फिरकीपटू रेहान अहमदने अश्विनला बाद करून भारताचा डाव संपवला. दुसर्‍या डावात भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 104 धावा केल्या. अक्षर पटेलने 45 आणि रविचंद्रन अश्विनने 29 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून टॉम हार्टलेने चार बळी घेतले. रेहम अहमदला तीन, जेम्स अँडरसनला दोन आणि शोएब बशीरला एक विकेट मिळाली. (IND vs ENG, 2nd Test Day 3)

शुभमनचे 11 महिन्यांनंतर शतक

शुभमन गिलने 12 डाव आणि 11 महिन्यांनंतर शतक झळकावले. त्याने अखेरचे शतक 9 मार्च 2023 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले होते. यानंतर त्याने ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध एकूण 12 डाव खेळले. यामध्ये त्याला एकही अर्धशतक आणि शतक करता आले नाही. शुभमनने आता इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावले. ही त्याची क्रमांक 3 वरील सर्वोत्तम धावसंख्या आहे. या पोझिशनमध्ये त्याने प्रथमच फिफ्टी प्लसचा स्कोअर गाठला. हे त्याचे कसोटीतील तिसरे शतक ठरले आहे. त्याच्या नाववर 4 अर्धशतकेही आहेत. त्याची उर्वरित 2 शतके बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहेत.

पहिल्‍या डावात यशस्‍वी जैस्‍वालचे स्‍मरणीय द्विशतक

तत्पूर्वी, यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 396 धावा केल्या होत्या. रोहितने यशस्वीसह पहिल्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली. मात्र, रोहित 14 धावा करून बाद झाला. यानंतर यशस्वीने शुभमन गिलसह दुसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. शुभमन पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आणि 34 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार मारले. श्रेयस अय्यर 27 धावा करून झेलबाद झाला. श्रेयसने यशस्वीसोबत 90 धावांची भागीदारी केली. कसोटी पदार्पण करणारा रजत पाटीदारने 32 धावांची खेळी केली. त्याने यशस्वीसोबत 70 धावांची भागीदारी केली. त्यानंतर यशस्वीने अक्षरसोबत 52 धावांची भागीदारी केली. अक्षरने 27 धावा केल्या. श्रीकर भरत 17 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यशस्वी 179 धावांवर नाबाद राहिला आणि रविचंद्रन अश्विन पाच धावांवर नाबाद राहिला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पहिल्या डावात सहा गडी गमावून 336 धावा केल्या होत्या. दुस-या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर अश्विन लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतला, पण यशस्वी त्याचे द्विशतक पूर्ण करून बाद झाला. त्याने 290 चेंडूत 209 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 19 चौकार आणि सात षटकार मारले. भारताने पहिल्या डावात 396 धावा केल्या. यशस्वी जैस्वाल व्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजाला 40 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन, शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. पहिल्या सामन्याचा हिरो असलेल्या टॉम हार्टलीला एक विकेट मिळाली.

भारताच्या 396 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने चांगली सुरुवात केली आणि एकही विकेट न गमावता 50 धावा केल्या. बेन डकेट 17 चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने 21 धावा करून बाद झाला, पण क्रॉलीने आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली. त्याने अवघ्या 52 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करून इंग्लंडची धावसंख्या एका विकेटवर 100 धावांच्या पुढे नेली. तो 76 धावा करून बाद झाला. यानंतर जसप्रीत बुमराहने ठराविक अंतराने इंग्लंडला धक्के दिले.

इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने 143 धावांची आघाडी घेतली. या सामन्यात जसप्रीत बुमराहने सहा विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय कुलदीप यादवने तीन बळी घेतले. अक्षर पटेलला एक विकेट मिळाली. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक 76 धावा केल्या. त्याच्याशिवाय इंग्लंडच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही. 47 धावा करणारा बेन स्टोक्स संघाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. (INDvsENG 2nd Test)

 

Back to top button