इटलीचा सिन्नर ‘ऑस्ट्रेलियन ओपन’चा नवा चॅम्पियन! रशियाचा मेदवेदेव उपविजेता | पुढारी

इटलीचा सिन्नर 'ऑस्ट्रेलियन ओपन'चा नवा चॅम्पियन! रशियाचा मेदवेदेव उपविजेता

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुरुवातीला सलग अपयश आले तरी लढवय्‍या खेळाडू कधीच हार मानत नाही, या अनुभवाची प्रचीती आज (दि.२८) ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्‍यानिमित्त टेनिसप्रेमींना आली. पहिले दाेन सेट गमावल्‍यानंतरही पुढील तीन सेटमध्‍ये झुंझार आणि आक्रमक खेळीचे प्रदर्शन करत इटलीचा युवा खेळाडू यानिक सिन्नर याने बाजी मारली. अत्‍यंत चुरशीच्‍या आणि उत्‍कृष्‍ट टेनिस खेळाचे प्रदर्शन घडविणार्‍या अंतिम सामन्यात त्‍याने रशियाच्या डॅनिल मेदवेदेव याचा 6-3, 6-3, 4-6, 4-6, 3-6 असा पराभव केला.
( Sinner Win Australian Open)

पहिला दाेन सेटमध्‍ये मेदवेदेवचे वर्चस्‍व

अंतिम सामन्यात मेदवेदेवने (Daniil Medvedev) सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. नवखा सिन्नरने पहिल्‍या दाेन सेटमध्‍ये चुकाही केल्या, त्‍याचा अचूक फायदा मेदवेदेवने घेतला. पहिला  सेट 6-3 ने  आपल्या नावावर केला. दुसऱ्या सेटमध्येही मेदवेदेवने (Daniil Medvedev) तुफानी खेळ दाखवला. त्याने सिन्नरला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही आणि हा सेट 6-3 असा जिंकला. अशा प्रकारे त्याने सामन्यात 2-0 ने आघाडी घेतली.

Sinner Win Australian Open : सिन्नरने जबरदस्त पुनरागमन

सलग दोन सेट गमावल्यानंतर सिन्नरने सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले आणि तिस-या सेटमध्ये त्याने मेदवेदेवला चांगलेच झुंझवले. हा सेट सेनरने 6-4 असा जिंकला. दोघांनी उत्‍कृष्‍ट टेनिसचे प्रदर्शन करत चौथ्‍या सेटमध्‍ये आपली सर्व्हिस कायम राखत ४-४ अशी बरोबरी साधली. मात्र सिन्नरने बॅकहँड आणि फाेरहँडने प्रेक्षकांची मने जिंकली. पाचव्‍या गेममध्‍ये  मेदवेदेवची सर्व्हिस भेदत त्‍याने 4-6 असा चाैथा सेट जिंकत सामन्‍यातील आपले आव्‍हान जिंवत ठेवले.

पाचव्‍या निर्णायक सेटमध्‍ये सिन्नरने मारली बाजी

पाचव्‍या आणि निर्णायक सेटमध्‍ये सिन्नरचा खेळ आणखी बहरला. ३-२ अशी आघाडी घेत त्‍याने मेदवेदेवची सर्व्हिस भेदत ४-२ अशी आघाडी घेतली. यानंतर आपली सर्व्हिस कायम राखत पाचवा सेट 3-6 असा जिंकत ताे ऑस्ट्रेलियन ओपन’चा नवा चॅम्पियन बनला.

ऑस्ट्रेलियन ओपनला तब्बल 10 वर्षांनी मिळाला नवा चॅम्पियन

ऑस्ट्रेलियन ओपनला (Australian Open 2024) तब्बल 10 वर्षांनी नवा चॅम्पियन मिळाला आहे. स्वित्झर्लंडच्या स्टॅन वॉवरिन्काने 2014 मध्ये विजेतेपद पटकावले होते. त्याच्यानंतर कोणताही नवा चॅम्पियन बनलेला नाही. 2004 पासून केवळ स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर, सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि स्पेनचा राफेल नदाल यांनीच ही स्पर्धा जिंकली आहे. 2004 पासून फेडररने सहा वेळा, जोकोविचने 10 वेळा तर, नदालने दोनदा विजेतेपद पटकावले आहे. दरम्यान, 2005 मध्ये मरात साफिन आणि 2014 मध्ये वॉवरिन्काने यांनी ही स्पर्धा जिंहली होती.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button