Sachin Tendulkar Deepfake Video : सचिन तेंडुलकर डीपफेक व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, गुन्हा दाखल | पुढारी

Sachin Tendulkar Deepfake Video : सचिन तेंडुलकर डीपफेक व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : सचिन तेंडुलकर डीपफेक व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून या गंभीर प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी सचिनचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो ऑनलाइन गेमिंगचा प्रचार करताना दिसत होता. यानंतर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर हा व्हिडिओ बनावट असल्याची माहिती दिली होती. (Sachin Tendulkar Deepfake Video)

याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलचे म्हणणे समोर आले आहे. सायबर सेलने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सचिन तेंडुलकरचा आवाजाचा गैरवापर करून त्याचा बनावट व्हिडिओ बनवण्यात आला हाेता. सचिन तेंडुलकर गेमिंग ॲपबद्दल बोलताना दिसला आणि तो आणि त्याची मुलगी ऑनलाइन गेम खेळून पैसे कमवत आहेत. (Sachin Tendulkar Deepfake Video) याप्रकरणी सचिनने एक ट्विटही केले होते, सचिनने आपल्या ट्विटमध्ये केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांना टॅग केले होते. सचिनने स्‍पष्‍ट केले हाेते की, हा एक फेक व्हिडीओ आहे आणि तुम्हाला फसवण्यासाठी बनवण्यात आला आहे, तंत्रज्ञानाचा गैरवापर हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की असे व्हिडिओ किंवा  ॲप्स किंवा जाहिराती दिसल्यास त्वरित कळवा.

 या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सांगितले की, आयपीसीच्या कलम ५०० आणि आयटी कायद्याच्या कलम ६६ सी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button