Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात सर्वात कमी तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची टक्केवारी | पुढारी

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात सर्वात कमी तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची टक्केवारी

पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज (दि.७) १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ९३ जागांसाठी सकाळी ७ वाजतापासून मतदान सुरू झाले आहे. देशातील ११ राज्यातील ९३ जागांसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान सकाळी ११ वाजेपर्यंत २५. ४१ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ३२.८२ टक्के तर महाराष्ट्रात सर्वात कमी १८.१८ टक्के मतदान झाले आहे. या संदर्भातील आकडेवारीचे वृत्त एएनआयने दिले आहे. (Lok Sabha Elections 2024)

लोकसभा निवडणुकीच्य तिसऱ्या टप्प्यात आसाम, बिहार, छत्तीसगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यात आज मतदान होत आहे. देशातील ११ राज्यांतील मतदारसंघात  सकाळी ९ वाजेपर्यंत ११ राज्यातील मतदारसंघातील एकूण  १०.५७ टक्के मतदान झाले.  त्यानंतरच्या टप्प्यात ११ वाजेपर्यंत २५. ४१ टक्के मतदान झाले. राज्यनिहाय मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे; (Lok Sabha Elections 2024)

Lok Sabha Elections 2024: तिसऱ्या टप्प्यासाठी सकाळी 11 वाजेपर्यंत 25.41% मतदान;

  • आसाम 27.34%
  • बिहार 24.41%
  • छत्तीसगड 29.90%
  • दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव 24.69%
  • गोवा ३०.९४%
  • गुजरात 24.35%
  • कर्नाटक 24.48%
  • मध्य प्रदेश 30.21%
  • महाराष्ट्र 18.18%
  • उत्तर प्रदेश 26.12%
  • पश्चिम बंगाल 32.82%

Back to top button