Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून कोच मिकी आर्थर यांना ‘नारळ’ | पुढारी

Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून कोच मिकी आर्थर यांना 'नारळ'

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकदिवसीय विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) संघात बरेच बदल केले. त्यांनी कर्णधारापासून प्रशिक्षकापर्यंत संघात बदल केले आहेत. यामध्ये पीसीबीने आपले परदेशी प्रशिक्षक मिकी आर्थर, ग्रँट ब्रॅडबर्न आणि अँड्र्यू पुटिक यांना करारमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी (दि.9) सांगितले की, पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सलमान नसीर या तिघांशी अंतिम कराराबाबत निर्णय घेतील. (Pakistan Cricket)

आशिया चषक आणि विश्वचषकानंतर पाकिस्तानच्या विदेशी प्रशिक्षकांनी सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांना कळवण्यात आले आहे की, आपल्या सेवांची आता पाकिस्तान संघाला आवश्यकता नाही. आशिया चषक आणि विश्वचषकादरम्यान मिकी आर्थर पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षक होते. आता त्यांच्या जागी मोहम्मद हाफीज या पदावर आहे. यासह ते संघात मुख्य प्रशिक्षकाची भूमिकाही बजावत आहे. (Pakistan Cricket)

पीसीबी देणार भरपाई

पीसीबीच्या अधिकाऱ्याने असेही सांगितले की, बोर्ड या तिघांना काही महिन्यांचा पगार नुकसानभरपाई म्हणून देईल. फलंदाजी प्रशिक्षक पुटिक यांनी करार स्वीकारण्यापूर्वी अफगाणिस्तानसोबतच्या त्याच्या नव्या नेमणुकीबाबत पीसीबीला माहिती दिली होती.

मोहम्मद हफीझ हा नवा संघ संचालक आणि प्रशिक्षक असूनही, पाकिस्तानी संघाचा ऑस्ट्रेलियात 3-0 असा व्हाईटवॉश झाला. आर्थर, पुटिक आणि ब्रॅडबर्न या तिघांची पीसीबीने गेल्या वर्षी एप्रिल-मेमध्ये अंतिम क्रिकेट व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नजम सेठी यांच्या कार्यकाळात नियुक्ती केली होती.

हेही वाचा :

Back to top button