IND W vs AUS W : टीम इंडियाला इतिहास घडवण्याची संधी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज तिसरा T-20 सामना | पुढारी

IND W vs AUS W : टीम इंडियाला इतिहास घडवण्याची संधी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज तिसरा T-20 सामना

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रलियाविरूद्धच्या टी-20 मालिकेला भारतीय महिला संघाने विजयी सुरूवात केली. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करत ऑस्ट्रेलियान मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव केला. यामुळे ही टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आज (दि.9) मालिकेतील निर्णायक सामना नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. (IND W vs AUS W) आज होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात भारताने विजय मिळवल्यास प्रथमच मायदेशात टी-20 फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकत इतिहास घडविण्‍याची संधी.

  भारत-ऑस्ट्रलिया यांच्‍यातील तीन टी-20 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. अखेरच्या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी कर्णधार हरमनप्रीतने मैदानावर धावा करणे आवश्यक आहे. सध्या तिचा फॉर्म चिंतेचे कारण आहे. सर्व फॉरमॅटमध्ये गेल्या 10 पैकी सात डावांमध्ये दुहेरी आकडा गाठता आलेला नाही. (IND W vs AUS W)

ऑस्ट्रेलियाचे जोरदार पुनरागमन

आत्तापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच टी-20 मालिका झाल्या आहेत. यामध्ये भारताने 2015-16 साली ऑस्ट्रेलियात झालेली एक मालिका जिंकली आहे. तर, ऑस्ट्रेलियाने चार मालिका जिंकल्या आहेत. .

एकमेव कसोटीत सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारतीय संघाने मालिकेला चांगली सुरुवात केली होती. मात्र एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 0-3 असा धुव्वा उडवत मालिका एकतर्फी जिंकली. यानंतर टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर नऊ विकेट्स राखून मोठा विजय मिळवला. मात्र, मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत मालिकेत बरोबरी साधली.

दुसऱ्या टी-20 सामन्यात दीप्तीची अष्टपैलू कामगिरी

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या दीप्ती शर्माने दुसऱ्या टी- 20 मध्ये अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. तिने 27 चेंडूत 31 धावा करत भारताला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाचे दोन विकेट घेत सामना रंजक बनवला. हरमनप्रीतच्या फॉर्मवर ती म्हणाली की, खेळाडूचा प्रत्‍येक दिवस चांगला असू शकत नाही. आम्ही मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत नसून त्याच्या गुणवत्तेनुसार चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत आहोत.

आघाडी फळीवर जबाबदारी

डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी आव्हानात्मक असेल. अशा परिस्थितीत धावा काढण्याची आणि चांगली सुरुवात करण्याची जबाबदारी आघाडी फळीतील फलंदाजांवर असेल. विशेषत: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष आणि हरमनप्रीत कौर यांच्या खांद्यावर फलंदाजीची जबाबदारी आहे. यापैकी एका खेळाडूला निश्चितच मोठी खेळी खेळावी लागणार आहे.

हेही वाचा :

Back to top button