पुढारी ऑनलाईन डेस्क: अभिनेता सलमान खान निवासस्थान गोळीबार प्रकरणात पाचव्या आरोपीला राजस्थानमधून अटक केली आहे. मुबंई गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे. या संदर्भातील माहिती मुंबई गुन्हे शाखेने दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. (Salman Khan residence firing case)
बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर काही अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणानंतर खळबळ उडाली होती. दरम्यान, मुंबई पोलिसांनी २४ तासात तपासाची सूत्रे वेगाने फिरवून अनेक संशयितांना अटक केली आहे.आत्तापर्यंत ४ संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती, यामधील एकाने कोठडीत असतानाच गळफास घेत जीवन संपवले. आणखी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Salman Khan residence firing case)
मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणातील पाचवा आरोपी मोहम्मद चौधरी याला राजस्थानामधून नुकतिच अटक केली आहे. त्याने सागर पाल आणि विक्की गुप्ता या दोन नेमबाजांना पैसे पुरवण्यात आणि रेकी करण्यात मदत केल्याचे तपासात समोर आले आहे. चौधरी याला आज मुंबईत आणण्यात आले असून, त्याला न्यायालयात हजर करून कोठडीची मागणी करण्यात येणार आहे, असे देखील मुंबई गुन्हे शाखेने स्पष्ट केल्याचे वृत्तात म्हटले आहे. (Salman Khan residence firing case)
हेही वाचा: