World Cup 2023 PAK vs AFG | अफगाणिस्तान विजयाच्या उंबरठ्यावर, पाकिस्तान गोलंदाजांना फुटला घाम | पुढारी

World Cup 2023 PAK vs AFG | अफगाणिस्तान विजयाच्या उंबरठ्यावर, पाकिस्तान गोलंदाजांना फुटला घाम

पुढारी ऑनलाईन : विश्वचषक 2023 मधील पाकिस्तान-अफगाणिस्तान सामना एका रोमांचक वळणावर आहे. अफगाणिस्तानचा संघ 283 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत आहे. या संघाने 43 षटकात 2 बाद 239 धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानला विजयासाठी 7 षटकात 44 धावा करायच्या आहेत. कर्णधार हशमतुल्ला शाहिदी आणि रहमत शाह क्रीजवर आहेत. शाहने आपल्या वनडे कारकिर्दीतील 24 वे अर्धशतक पूर्ण केले आहे. विश्वचषकातील हे त्याचे तिसरे अर्धशतक आहे.

तत्पूर्वी, इब्राहिम झद्रान 87 धावा करून बाद झाला. हसन अलीने त्याला यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानकडे झेलबाद करून पाकिस्तानला सामन्यात परत आणले. तर रहमानउल्ला गुरबाज 65 धावा करून झेलबाद झाला, त्याला शाहीन शाह आफ्रिदीने पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

130 धावांची सलामी

अफगाणी सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांची पाकच्या गोलंदाजांची धुलाई करत वादळी सुरुवात केली. दोघांनी अर्धशतकी खेळी साकारून संघाचे शतक पूर्ण केले. गुरबाज 22.1 व्या षटकात बाद झाला. यावेळी अफगाणिस्तानची धावसंख्या 130 होती. शाहीन आफ्रिदीने त्यामा माघारी धाडले. गुरबाजने 1 षटाका, 9 चौकारच्या मदतीने 53 चेंडून 65 धावांची खेळी केली.

झद्रानच्या 1000 धावा

यादरम्यान, झद्रान हा एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा अफगाणिस्तानचा फलंदाज ठरला. त्याने 24 डावात ही कामगिरी केली. त्याने गुरबाजला (27 डाव) मागे टाकले.

पाकिस्तानने जिंकला टॉस

तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर हा सामना होत आहे. (World Cup 2023 PAK vs AFG) प्रथम फलंदाजी करताना पाकिस्‍तानच्‍या संघाने ७ गडी गमावत २८२ धावा केल्‍या आहेत.

पाकिस्‍तानची सावध सूरुवात

पाकिस्‍तानने सावध सुरुवात केली.  पाकिस्‍तानने आठ षटकांमध्‍ये ५१ धावा केल्‍या. मात्र पाकिस्तानला पहिला धक्का 11व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बसला. अजमतुल्लाने इमाम उल हकला नवीन उल हककरवी झेलबाद केले. इमाम 22 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. त्याने अब्दुल्ला शफीकसोबत ५६ धावांची भागीदारी केली.

अब्दुल्ला शफीकचे अर्धशतक

पाकिस्तानला 110 धावांवर दुसरा धक्का बसला. २३व्या षटकात नूर अहमदने अब्दुल्ला शफीकला एलबीडब्ल्यू आऊट केले. यानंतर 25व्या षटकात नूर अहमदने मोहम्मद रिझवानला मुजीबकरवी झेलबाद केले. रिझवानला आठ धावा करता आल्या. शफीकने 75 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 58 धावांची खेळी केली.

बाबरची ७४ धावांची महत्त्‍वपूर्ण खेळी

३४ व्‍या षटकामध्‍ये १६३ धावांवर पाकिस्‍तानला चौथा धक्‍का बसला.नबीच्‍या गोलंदाजीवर शकीलने रशीद खानकडे झेल दिला. त्‍याने ३४ चेंडूमध्‍ये २५ धावा केल्‍या धावांमध्‍ये केल्‍या. ३६ व्‍या षटकात कर्णधार बाबर आझमने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्‍याने ६९ चेंडूत ४ चौकाराच्‍या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर बाबर आझमने पाकिस्‍तानचा डाव सावरला. पाकिस्‍ताने २०० धावांचा टप्‍पा पूर्ण केला. मात्र  ४२ व्‍या षटकात नूर अमदने नबी करवी बाबरला बाद केले. त्‍याने ९२ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. यामध्‍ये ४ चाैकार तर १ षटकाराचा समावेश हाेता.

 इफ्तिखार आणि शादाबची अर्धशतकी भागीदारी

बाबर बाद झाल्‍यानंतर शादाब खान आणि इफ्तिखार अहमद यांनी  फटकेबाजी करत धावफलक हालता ठेवला. या दाेघांची अर्धशतकी भागीदारी पाकिस्‍तानसाठी महत्त्‍वपूर्ण ठरली. अखेरच्‍या षटकात नवीन हकच्‍या गाेलंदाजीवर इफ्तिखारने अजमतुल्‍लाकडे साेपा झेल दिला. त्‍याने ४ षटकार आणि २ चाैकारच्‍या मदतीने २७ चेंडूत ४०  धावा केल्‍या. अखेरच्‍या षटकातील शेवटच्‍या चेंडूवर शादाब खान याने नबीकडे झेल दिला. त्‍याने १ षटकार आणि १ चाैकाराच्‍या मदतीने ३८ चेंडूत ४० धाा केल्‍या. नवीन-उल-हकने अखेरच्‍या षटकात दाेन बळी घेतले. अखेर ५० षटकात पाकिस्‍ताने ७ गडी गमावत २८२ धावा केल्‍या.

अफगाणिस्‍तानच्‍या नवीन-उल-हक याने २, मोहम्मद नबी १, अजमातुल्लाह ओमरजाई १, नूर अहमद ३ बळी घेतले.

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन

अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टिरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, उसामा मीर, शाहीन आफ्रिदी, हसन अली, हरिस रौफ.

अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन

रहमानुउल्लाह गुरबाज, इब्राहिम झदरान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमातुल्लाह ओमरजाई, इक्रम अलीखिल (यष्टिरक्षक), मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, नूर अहमद.

Back to top button