Yuvraj Singh : युवराज सिंगचे मोठे वक्तव्य, म्हणाला; ‘चहलला वगळणे मोठी चूक’ | पुढारी

Yuvraj Singh : युवराज सिंगचे मोठे वक्तव्य, म्हणाला; ‘चहलला वगळणे मोठी चूक’

पुढारी ऑनलाईन डेस्क : Yuvraj Singh : विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. मात्र या संघात लेगस्पिनर युझवेंद्र चहलचे (yuzvendra chahal) नाव नसल्याने बहुतांश क्रिकेट तज्ज्ञ आश्चर्यचकित झाले आहेत. अक्षर पटेल दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर त्याच्या जागी अनुभवी रविचंद्रन अश्विनचा संघात समावेश करण्यात आला. पण चहलला संधी देण्यात आली नाही. याच मुद्यावरून माजी अष्टपैलू युवराज सिंग देखील खूप निराश झाला आहे. भारतीय संघाला युजवेंद्र चहलची उणीव भासू शकते, असे त्याने मत व्यक्त केले आहे.

युवराज सिंग (Yuvraj Singh) म्हणाला, चहलसारखा लेगस्पिनर भारतीय परिस्थितीत उपयुक्त ठरू शकतो. त्याला बाहेर ठेवणे ही चूक ठरू शकते. किमान त्याला संघात ठेवता आले असते. लेगस्पिनर हा असा असतो जो तुमच्यासाठी नेहमी विकेट घेतो. कुलदीप चमकदार कामगिरी करत आहे. पण चहल टर्निंग आणि संथ विकेट्सवर धोकादायक ठरू शकतो,’ असे त्याने सांगितले.

‘भारताच्या वेगवान गोलंदाजीत कमतरता होती पण बुमराहचे यशस्वी पुनरागमन संघासाठी महत्त्वाचे ठरले आहे. भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे यात शंका नाही. पण आशिया चषक जिंकल्याने विश्वचषक जिंकूच याची शाश्वती नाही. संघाला सतत्यपूर्ण कामगिरी करणे आवश्यक आहे. त्यात कसलीच तडजोड असता कामा नये. पाचव्या क्रमांकावर श्रेयस अय्यर की इशान किशनला खेळवायचे हे संघ व्यवस्थापनाला ठरवावे लागेल. दोघांनी या स्थानावर धावा केल्या आहेत,’ असेही स्पष्ट मत युवराजने (Yuvraj Singh) व्यक्त केले.

Back to top button