MPL 2023 : भक्ती-शक्तीच्या वारीने एमपीएलचे उद्घाटन | पुढारी

MPL 2023 : भक्ती-शक्तीच्या वारीने एमपीएलचे उद्घाटन

पुणे : गणेशवंदना…. उरात भरलं वार…. अभिनेत्री अमृता खानविलकरच्या चंद्रा गाण्यावरील नृत्य अदा… अन् भक्ती-शक्तीच्या वारीने एमपीएल स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन झाले. (MPL 2023)

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) ची सुरुवात गहुंजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन गणेशवंदनाने झाली. त्यानंतर मराठी आणि हिंदी गाण्यांवर नृत्य सादर करण्यात आले. शंकर महादेवन यांनी गायलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीगचे टायटल साँगवर अमृता खानविलकर हिने नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या उद्घाटन कार्यक्रमाला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व आमदार रोहित पवार, उपाध्यक्ष किरण सामंत, सचिव शुभेंद्र भांडारकर, सहसचिव संतोष बोबडे, खजिनदार संजय बजाज यांसह अपेक्स समितीचे सदस्य उपस्थित होते. (MPL 2023)

स्पर्धा सुरू होण्याआधी 1973 च्या महिला संघातील खेळाडू शमा लुंकड, माधुरी सावंत, विजया पाटील, कल्पना तापीकर, उज्ज्वला पवार, नीलिमा जोगळेकर आणि स्मृती मानधना यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना ऋतुराज गायकवाडचा पुणेरी बाप्पा व केदार जाधवचा कोल्हापूर टस्कर्स यांच्यात सुरू झाला.

हेही वाचा;

Back to top button