22 Years Of Lagaan : आमिर खानने नाकारला होता ‘लगान’ | पुढारी

22 Years Of Lagaan : आमिर खानने नाकारला होता ‘लगान’

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमिर खानच्या (Aamir Khan) लगान चित्रपटाला गुरुवारी (१५ जून) २२ वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाने हिंदी किंवा भारतीय सिनेमासृष्टीत एक नवा इतिहासच रचला होता. आज हा चित्रपट एक कल्ट सिनेमा म्हणून पाहिला जातो. ऑस्कर पर्यंत मजल मारणाऱ्या या चित्रपटाला आजही आवर्जुन पाहिले जाते. एकाच दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ या सनी देओलच्या चित्रपटाने लगानला कडवी टक्कर दिली होती. आज काल दोन मोठ्या कलाकारांचे चित्रपट एकाच दिवशी पदर्शित होणार असतील तर तडजोड करुन प्रदर्शनाच्या तारखा बदलल्या जातात. पण, हे दोन असे चित्रपट आहेत जे एकाच दिवशी प्रदर्शित होऊन दोन्ही चित्रपटांनी यशस्वी गल्ला जमवला व प्रेक्षकांच्या वेगळे स्थान निर्माण केले. आता २२ वर्षांनी गदरचा सिक्वेल येत आहे. तर लगान या चित्रपटा विषयीचे अनेक रहस्य आमिर खानने २२ वर्षांनी उलगडले आहेत(‘Lagaan’ as we celebrate its 22-year milestone). त्यातील एक म्हणजे त्याने हा चित्रपट करण्यासाठी नकार दिला होता. (22 Years Of Lagaan)

लगानला दिला नकार (22 Years Of Lagaan)

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आमिर खानने लगान विषयीचे अनेक किस्से व रहस्य उलगडले. मिस्टर परफेक्टस्निस्ट म्हणून बॉलिवूडमध्ये स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या अमिर खानाने लगान या चित्रपटाला नकार दिला होता. हे ऐकूण नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण, हे सत्य आहे. या बाबत आमिर खान स्वत: म्हणाला, दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर (Ashutosh Gowariker) माझ्याकडे या चित्रपटाची स्क्रीप्ट घेऊन आला. त्याने पहिली पाच मिनिटे या चित्रपटाचे वाचन केले. मी पाचच मिनीटात त्याला म्हणालो अरे काय हे, एक दुष्काळातले गाव आहे. तिथे कधीच पाऊस पडत नाही, मग इंग्रजांचे कर रद्द करण्यासाठी ते इंग्रजांसोबत क्रिकेट खेळतात आणि कर माफ केला जातो. हे सगळं न पटण्यासारखं आणि हास्यास्पद होतं. मी आशुतोषला म्हणालो अरे आजच्या जमाण्यात कोण असल्या गावाकडच्या आणि इंग्रजांच्या काळातले चित्रपट पाहतात रे. पहिल्या दिवशी हा सिनेमा आपटेल. तुझे आधीच दोन चित्रपट आपटले आहेत. जरा चांगल काहीतरी काम कर असं मी आशितोषला म्हणालो.

आशुतोषने स्क्रीप्टसाठी तीन महिने वाया घालावली

याबाबत आमिर खान पुढे म्हणतो, की माझ्या या प्रतिक्रीये नंतर आशुतोष थोडा नाराज झाला आणि बरं म्हणून निघून गेला. यानंतर थेट तिन महिन्यांनी आशुतोषचा मला पुन्हा फोन आला. त्याने पुन्हा चित्रपटाची स्क्रीप्ट ऐकवायची आहे असं म्हणाला. मी म्हणालो ऐकवं, तो म्हणाला नाही मला प्रत्यक्ष भेटून ऐकवायची आहे. मला आशुतोषचा स्वभाव माहिती आहे. तो खूप हट्टी आहे आणि मला वाटलं की तो पुन्हा तीच क्रिकेटची स्क्रिप्ट मला ऐकवणार आहे. (22 Years Of Lagaan)

आशुतोष माझ्या घरी आला आणि माझ्या समोर त्याने संपूर्ण स्क्रीप्टचे वाचन केले. ती स्क्रीप्ट ऐकल्यावर मी अवाक झालो. तो वाचन करत होतो त्या दरम्यान मी हसत होतो, रडत होतो सर्व भावना उफाळून येत होत्या. स्क्रीप्ट ऐकल्यावर मला कळाले की, या चित्रपटासाठी खूप बजेट लागणार आहे. सर्व झाल्यावर मी आशुतोषला म्हणालो, हा चित्रपट खूप महागडा बनणार आहे. त्यामुळे आधी तू प्रोड्युसरला तयार कर आणि त्याला मी या चित्रपटात काम करणार आहे असू सांगू नको. तसंच या चित्रपटासाठी तू माझ्या विसंबून राहू नको, तुला तुझा प्रोड्युसर आणि चित्रपटात काम करणार कलाकार मिळाला तर तू तो चित्रपट माझ्या शिवाय बनवून टाक. (22 Years Of Lagaan)

आमिरला गुरुदत्त, व्ही. शांताराम, के. आसिम सारखे व्हायचे होते

आमिर खान पुढे म्हणाला, अशा प्रकारे स्क्रीप्ट आवडून सुद्धा मी एक प्रकारे आशुतोषला नकार दिला होता. आशुतोष अनेक कलाकारांकडे गेला आणि प्रोड्युसरकडे गेला पण, त्याचा चित्रपट करण्यासाठी कोणीच तयार होत नव्हतं. मी अधून मधून आशुतोषला फोन करायचो आणि विचारायचो की बाबा कोणी तयार झालं का? तर त्याच्याकडून नाही असंच उत्तर यायचं. हा चित्रपट कोण करायला तयार होत नाही म्हणून मी सुद्धा अस्वस्थ होत होतो. मला आयुष्यात गुरुदत्त, व्ही. शांताराम, के आसिफ, विमल रॉय यांच्यासारखं व्हायचं होतं. मी माझ्या मनालाच विचार जर येथे हे तिघे असते तरी त्यांनी काय केलं असतं. ते असा चित्रपट करण्यास कधीच घाबरले नसते. आमिर खान म्हणतो, ‘ मी माझे मलाच विचारले माझे जे हिरो आहेत ते असे करण्यास कधीच डगमगले नसते. त्यांना चित्रपट बनवताना अनेक अडचणी आल्या पण, त्यांनी त्यांचा सामना केला. म्हणूनच ते महान बनले. मी हिम्मत वाढवली आणि अखेर स्वत: चित्रपट करण्यासाठी तयार झालो. कोणी प्रोड्युसर नसल्यामुळे मला ती सुद्धा जबाबदारी घ्यावी लागली. अशा प्रकारे मी निर्माता सुद्धा बनलो.

आमिरला निर्माता बनायचे नव्हते

आमिर खानचे वडिल स्वत: चित्रपट लेखक आणि निर्माते होते. त्याने अगदी जवळून वडिलांचा संघर्ष पाहिला होता. त्यामुळे त्याला कधीच निर्माता व्हायचे नव्हते. पण, हा चित्रपट करायचा असेल तर त्याला माहित होतं की आपल्यालाच प्रोड्युसर व्हायला लागेल. याबाबत आमिर खान म्हणतो, ‘ या चित्रपटाची कथा मी माझे वडिल, आई आणि माझी पहिली पत्नी रीना हिला वाचून दाखवली. वडिलांना ही कथा खूप आवडली आणि त्यांना समजलं की याच्या निर्मितीला खूप खर्च येणार आहे. पण, त्यांनी मला सांगितले की, कथा चांगली असली तर चित्रपट बनविण्याला काहीच हरकत नाही. लगान चित्रपटाला होकार देण्यास आमिरला लागला दोन वर्षांचा काळ

लगान माझ्यासाठी एक प्रवास आहे

आमिर खान सांगतो, ‘ लगान चित्रपट हा माझ्यासाठी एक प्रवास आहे. या चित्रपटसोबत माझे जे नातं आहे ते खूपच खास आहे. या चित्रपटाचे शुटींग सहा महिने चालले होते. या दरम्यान आम्ही सर्व लोक जवळपास ३०० हून अधिक लोक एकाच इमारतीत राहात होतो. रोज सकाळी ४ वाजता उठने त्यानंतर शुटींगसाठी जाणे आणि पुन्हा सायंकाळी परत एकत्र येणे. एके दिवशी बस मध्ये कोणीतरी गायत्री मंत्र लावले. तेव्हा पासून शुटींग संपेपर्यंत रोज सकाळी ४५ मिनिटे आम्ही गायत्री मंत्र ऐकायचो. इतकच नाही तर आमच्या सोबत जे इंग्रज कलाकार होते ते सुद्धा आमच्या सोबत गायत्री मंत्र ऐकत असत.


अधिक वाचा :

Back to top button