PBKS vs LSG : लखनौचे पंजाबला १६० धावांचे आव्हान | पुढारी

PBKS vs LSG : लखनौचे पंजाबला १६० धावांचे आव्हान

लखनौ; वृत्तसंस्था : आपल्या होमग्राऊंडवर विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या लखनौ सुपर जायंटस्ला पंजाब किंग्जने 159 धावांत रोखले. शिखर धवनच्या अनुपस्थितीत पंजाब किंग्जचे नेतृत्व करणार्‍या सॅम करनने 4 षटकांत 3 फलंदाज बाद करत लखनौच्या फलंदाजीला खिंडार पाडले. लखनौ सुपर जायंटस्कडून कर्णधार के.एल. राहुलने सर्वाधिक 74 धावा केल्या.

पंजाबने लखनौला फलंदाजी करण्यासाठी पाचारण केल्यानंतर सलामीवीर कायेल मेयर्स आणि के.एल. राहुल यांनी आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोघांना संघाला अर्धशतकी मजल मारून देण्यासाठी 7 षटके वाट पाहावी लागली. पंजाबच्या हरप्रीत ब्रारने मेयर्सला 29 धावांवर बाद केले, तर दीपक हुड्डाला सिकंदर रझाने 2 धावांवर माघारी धाडले.

पाठोपाठच्या दोन धक्क्यांतून लखनौला कर्णधार के.एल. राहुल आणि कृणाल पंड्या यांनी सावरले. या दोघांनी संघाला शतकी मजल मारून दिली. के.एल. राहुलने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. कृणाल पंड्याला कगिसो रबाडाने बाद केले. त्यानंतर आलेला निकोलस पूरन देखील पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. यामुळे लखनौची अवस्था 2 बाद 110 वरून 4 बाद 111 धावा अशी झाली. यानंतर मार्कस स्टॉयनिस देखील 15 धावांची भर घालून परतला. लखनौचे एका पाठोपाठ एक फलंदाज स्वस्तात माघारी जात असताना के.एल. राहुल एकटा किल्ला लढवत होता. त्याने 56 चेंडूत 74 धावा करत लखनौला 150 चा टप्पा पार करून दिला. अखेर लखनौने 20 षटकांत 8 बाद 159 धावा केल्या.

(PBKS vs LSG)

अपडेट्स :

लखनौला मोठा धक्का; राहूल बाद

सामन्याच्या १९ व्या ओव्हरमध्ये लखनौला मोठा धक्का बसला. पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने लखनौचा कर्णधार के.एल. राहूलला एलिसकरवी झेलबाद केले. राहूलने आपल्या खेळीत ५६ बॉलमध्ये ७४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. यामध्ये त्याने १ षटकार आणि ८ चौकार लगावले.

लखनौचा निम्मा संघ तंबूत

सॅम करणने लखनौ सुपर जायंट्सला पाचवा धक्का दिला. त्याने १८ व्या ओव्हरमध्ये मार्कस स्टॉइनिसला बाद केले. स्टॉइनिस ११ चेंडूत १५ धावा करून बाद झाला.

लखनौला चौथा धक्का; निकोलस पूरन बाद

कागिसो रबाडाने १५ व्या ओव्हरमध्ये निकोलस पूरन आणि कृणाल पांड्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर रबाडाने क्रुणाल पांड्याला शाहरुखकरवी झेलबाद केले. त्याने १७ चेंडूत १८ धावा केल्या. तिसऱ्या बॉलवर निकोलस पूरनला शाहरुखने झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. १५ ओव्हरनंतर लखनौची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात १११ धावा आहे.

लखनौला तिसरा धक्का; कृणाल पंड्या बाद

लखनौला १५ व्या ओव्हरमध्ये ११० धावांवर तिसरा धक्का बसला. कागिसो रबाडाने कृणाल पांड्याला बाऊंड्री लाइनवर शाहरुख खानकरवी झेलबाद केले. क्रुणाल १७ बॉलमध्ये १८ धावा करून बाद झाला.

राहूलचे अर्धशतक

संघाच्या विकेट पडत असताना लखनौचा कर्णधार के.एल.राहूने अर्धशतक झळकावले. त्याने ४० बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. यामध्ये त्याने ७ चौकार लगावले.

लखनौला दुसरा धक्का; दीपक हुड्डा स्वस्तात माघारी

सामन्याच्या नवव्या ओव्हरमध्ये पंजाबचा गोलंदाज रझाने दीपक हुडाला एलबीडब्ल्यू केले. दीपकने आपल्या खेळीत अवघ्या २ धावा केल्या.

लखनौला पहिला धक्का; मेयर्स बाद

सामन्याच्या आठव्या ओव्हरमध्ये मेयर्सच्या रूपात लखनौला पहिला धक्का बसला. त्याला हरमनप्रीत ब्रारने हरमनप्रीत सिंगकरवी झेलबाद केले. मेयर्सने आपल्या खेळीत २३ बॉलमध्ये २९ धावा केल्या. यामध्ये ३ षटकार आणि १ चौकार लगवाले.

राहूल-मयेर्स यांची अर्धशतकी भागिदारी

सामन्याच्या सुरूवातीपासून संयमी खेळी करत लखनौच्या सलामीवीरांनी अर्धशतकी भागिदारी केली. यांमध्ये राहूलने २१ बॉलमध्ये २१ धावा केल्या, तर मयेर्सने २० बॉलमध्ये २९ धावांची खेळी केली.

हेही वाचा;

Back to top button