Virat Kohli: कोहलीची बॅट गरजली, एकाच मैदानावर 2500 हून अधिक धावा करणारा ठरला पहिला खेळाडू | पुढारी

Virat Kohli: कोहलीची बॅट गरजली, एकाच मैदानावर 2500 हून अधिक धावा करणारा ठरला पहिला खेळाडू

पुढारी ऑनलाईन डेस्क : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात मोठी कामगिरी केली. स्टार फलंदाज कोहली कोणत्याही एका मैदानावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. एकाच ठिकाणी 2500 हून अधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात कोहलीने 11 धावा करताच नवा विक्रम आपल्या नावावर केला.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 33 चेंडूत 50 धावा पूर्ण करणारा विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. विराट कोहलीने आयपीएलमध्ये 5 शतके आणि 46 अर्धशतके केली आहेत. सध्याच्या मोसमात 7000 धावांचा टप्पा गाठणारा पहिला खेळाडू बनण्याकडे विराट कोहलीची नजर असेल. गेल्या हंगामात कोहलीने 16 सामन्यात 341 धावा केल्या.

कोहलीने आयपीएलच्या 16 व्या हंगाची दमदार सुरुवात केली. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात 49 चेंडूत 82 धावांची दमदार खेळी केली आणि फॅफ डुप्लेसीसोबत पहिल्या विकेटसाठी 148 धावांची भागीदारी केली. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 18 चेंडूंत 21 धावा करून बाद झाला. तिसऱ्या सामन्यात त्याने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 61 धावांची खेळी केली. तर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यातही तो अर्धशतक करून बाद झाला.

Back to top button