WPL 2023 : मुंबईचा विजयी प्रारंभ; गुजरातवर १४३ धावांनी विजय | पुढारी

WPL 2023 : मुंबईचा विजयी प्रारंभ; गुजरातवर १४३ धावांनी विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : वुमन्स प्रीमियर लीगमधील पहिला सामना आज (दि.4) मुंबई इंडियन्स विरूद्ध गुजरात जायंट्स यांच्यात खेळवण्यात आला.  या सामन्यात मुंबईचा 143 धावांनी विजय झाला. सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकून गुजरातने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजी करताना मुंबईने गुजरातला 208 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ 64 धावा करू शकला. (WPL 2023)

वुमन्स प्रीमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने 200 धावांचा टप्पा पार केला. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी 20 षटकांत 5 गडी गमावून 207 धावा केल्या. त्याच्याकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक 65 धावा केल्या. तिने 30 चेंडूंत 14 चौकार मारले. सलामीवीर हिली मॅथ्यूजने 31 चेंडूत 47 आणि अमेलिया केरने 24 चेंडूत नाबाद 45 धावा केल्या. नतालीने 23 आणि पूजा वस्त्राकरने 15 धावांचे योगदान दिले. (WPL 2023)

यास्तिका भाटिया एक धाव काढून बाद झाली. इसी वँगने एका चेंडूत सहा धावा केल्यानंतर नाबाद राहिला. गुजरात जायंट्सकडून स्नेह राणाने दोन बळी घेतले. ऍशले गार्डनर, तनुजा कंवर आणि जॉर्जिया वेरेहम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

प्रत्युत्तरात गुजरातचे खेळाडू  फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकले नाहीत. मुंबईच्या खेळाडूंनी केलेल्या गोलंदाजीमुळे गुजरातचा डाव ६४ धावांवर आटोपला. गोलंदाजीमध्ये इशाकने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या तर, ब्रुंट आणि केर यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. वोंगने 1 विकेट घेतली.  गुजरातकडून हेमलताने सर्वाधिक 29 धावा केल्या. हेमलता व्यतिरिक्त दुसऱ्या खेळाडूंना फलंदाजीमध्ये खास कामगिरी करू शकले नाहीत.

हेही वाचा;

Back to top button