United Cup Tennis : राफेल नदाल, अलेक्झांडर झ्वेरेव पुन्हा गारद | पुढारी

United Cup Tennis : राफेल नदाल, अलेक्झांडर झ्वेरेव पुन्हा गारद

थेट ऑस्ट्रेलियातून – उदय बिनीवाले 

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या युनायटेड कप टेनिस स्पर्धेत (United Cup Tennis) ज्येष्ठ आणि श्रेष्ठ राफेल नदाल तसेच जगातील क्र. 3 चा खेळाडू झ्वेरेव सलग दोन वेळा पराभूत झाल्याने टेनिस रसिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

स्पर्धेत आज अमेरिकेने निर्णायक आघाडी घेतली. विशेष म्हणजे टेलर फ्रीटजने झ्वेरेव्ह ला 6-1, 6-4 असे सहज हरविले. मॅडिसन किजने जर्मनीच्या ज्यूल नेमीअरला 6-2, 6-3 असे सहज नमविले. त्यामुळे अमेरिकेचा संघ शहर गटात अंतिम फेरीत पोहोचला आहे.

आजच्या धक्कादायक निकालामध्ये ऑस्ट्रेलियाच्या अलेक्स डी मिनॉरचा विजय महत्त्वाचा ठरला. त्याच्याविरुध्द नदाल 6-3, 1-6, 5-7 असा पराभूत झाला.

जगातील क्र.1 पोलंडच्या इगा स्विआटेकने श्रेष्ठ आणि अनुभवी बेलिंडा बेन्सिकला 6-3, 7-6 असे नमविले. अन्य उत्कंठापूर्वक सामन्यात ग्रीस वि. बेल्जियम सामन्यात स्तिफनोस स्टीतिपासने डेव्हिड गोफिनचा 6-3, 6-2 असा धुव्वा उडविला. (United Cup Tennis)

सिडनी, पर्थ, ब्रिस्बेन येथून उपांत्य पूर्व फेरीत कोणते संघ पोहोचतील याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. पर्थ येथे ‘अ’ गटात बल्गेरिया आणि ग्रीस तर ‘फ’ गटात फ्रान्स आणि क्रोएशिया अग्रस्थानी आहेत. ब्रिस्बेन येथे ‘ब’ गटात स्वित्झर्लंड आणि पोलंड यांनी तर ‘इ’ गटात ब्राझील आणी इटली आघाडीवर आहेत. सिडनी येथे ‘क’ गटात अमेरिका आणी झेकोस्लोव्हाकिया याबरोबर ‘ड’ गटात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांची सरशी दिसून येते.

हेही वाचा…

Back to top button