Year Ender 2022 : २०२२ मध्ये क्रिकेट विश्वातील ‘या’ दिग्गजांनी केला जगाला अलविदा… | पुढारी

Year Ender 2022 : २०२२ मध्ये क्रिकेट विश्वातील 'या' दिग्गजांनी केला जगाला अलविदा...

पुढारी ऑनलाईन डेस्क : २०२२ साली क्रिकेट विश्वात अनेक चांगल्या घटना घडल्या. त्यासोबतच काही धक्कादायक आणि दु:खद घटना घडल्या. या घटनांमुळे संपूर्ण क्रीडाविश्वावर शोककळा पसरली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या खेळीमुळे नाव कमावलेल्या या खेळाडुंना आपला प्राण गमवावा लागला होता. आज आपण त्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. (Year Ender 2022)

ऍण्ड्रू सायमंड्स

ऑस्ट्रेलियाच्या संघातील उत्तम अष्टपैलू खेळाडू ऍण्ड्रू सायमंड्सकडे पाहिले जायचे. सायमंड्स हा दोनवेळा क्रिकेट विश्वविजेत्या संघाचा भाग होता. आक्रमक फलंदाजी व गोलंदाजी करताना त्याने ऑस्ट्रेलियाला अनेक विजय मिळवून देण्यात महत्वाची कामगिरी बजावली होती. १४ मे २०२२ रोजी झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. अवघ्या ४६ व्या वर्षी अपघाती निधन झाल्याने क्रीडाविश्वातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती.

शेन वॉर्न

क्रिकेट विश्वातील महान फिरकीपटू म्हणून ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नकडे पाहिले जाते. क्रिकेट कारकीर्दीत त्याने अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर मैदानात नाचवले. तसेच मैदानाबाहेर ही त्याने प्रशिक्षक आणि समालोचक कारकीर्द गाजवली. ४ मार्च २०२२ रोजी त्याने या जगाचा निरोप घेतला. थायलंड येथे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

असद रौफ

पाकिस्तानचे प्रसिद्ध पंच असद रौफ यांचे देखील या वर्षी निधन झाले. आपल्या पंचाच्या कारकिर्दीतत नेहमीच वादग्रस्त राहिले होते. रौफ अलीकडच्या काळात क्रिकेट विश्वापासून दूर होते. वयाच्या ६६ वर्षी रौफ यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

रूडी कर्स्टन

चाहत्यांना एखादा खेळाडू जसा आवडतो त्याप्रमाणे सामन्याचे पंचदेखील आवडत असतात. क्रिकेटविश्वात अनेक नामवंत पंच आहेत. त्यापैकी खेळाडू व चाहत्यांच्या आवडत्या पंचांपैकी एक असलेल्या रूडी कर्स्टन यांचादेखील अपघातात मृत्यू झाला.

हेही वाचा;

Back to top button