Alia Bhatt : आई झाल्यानंतर बदलली आलिया ; अनंत अंबानी- राधिका मर्चेंट यांच्या साखरपुड्यातील लूक व्हायरल | पुढारी

Alia Bhatt : आई झाल्यानंतर बदलली आलिया ; अनंत अंबानी- राधिका मर्चेंट यांच्या साखरपुड्यातील लूक व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्योगपती मुकेश अंबानी याचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट याच्या साखरपुडा पार पडलाय. या साखरपुड्याला अंबानी परिवारासह मित्रमंडळी आणि अनेक स्टार्संनी हजेरी लावली होती. या खास संभारंभास अभिनेत्री आलिया भट्ट आणि तिचा पती रणबीर कपूर उपस्‍थित होते. आई झाल्यानंतर पहिल्यांदाच आलिया या संभारंभासाठी पोहोचली. यावेळी आलियाच्या ( Alia Bhatt ) चेहऱ्यावरील ग्लोने सर्वाचे लक्ष वेधले.

अभिनेत्री आलिया भट्ट ( Alia Bhatt ) अनंत अंबानीच्या साखरपुड्यातील काही खास फोटो इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या वेळी आलिया नेट ब्लू कलरचा कुर्त्यात ग्लॅमरस दिसत होती. मोकळ्या केसांची स्टाईल, कानात हटके इअररिग्स, मिनिमल मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केलाय. यात खास करून आई बनल्यानंतर पहिल्यांदा आलिया मोठ्या फॅक्शनमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील ग्लो खूपच खुलून दिसत होता. या फोटोला तिने एक ❄️ ‘स्नोफ्लेक इमोजी’ शेअर केला आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी आलियावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने ‘विवाह ते आई होण्याच्या प्रवासात जर एखाद्या मुलीला हॉट बनवले असेल तर ती फक्त तूच आहेस, आलिया.’, ‘Stunning as always’, ‘Beauty 🔥’, ‘Stunner! ☀️❤️’, ‘Chanda bhi diwana hai tera 😭❤️’, ‘OH WOWWWWWWWW 😍😍😍😍’, ‘Omggg how can someone look this good?!! 🥰🥰 alia has made my year…alia>>>> ❤️❤️❤️’. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यत जवळपास २० लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर सिंह दोघेजण ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एकत्र दिसले होते. याशिवाय दोघांच्या ‘डार्लिंग्स’ चित्रपटाची ओटीटीवर खूपच चर्चा झाली. गेल्या काही दिवसापूर्वी आलियाने एका चिमुकलीला जन्म दिला असून तिने तिचे नाव ‘राहा’ असे ठेवले आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

Back to top button