FIFA World Cup 2022 : कतारचे आव्हान संपुष्टात | पुढारी

FIFA World Cup 2022 : कतारचे आव्हान संपुष्टात

दोहा; वृत्तसंस्था : सलग दुसर्‍या पराभवामुळे यजमान कतारचे फिफा वर्ल्डकप 2022 मधील आव्हान संपुष्टात आले. शुक्रवारी झालेल्या ‘ए’ गटातील सामन्यात सेनेगलने कतारचा 3 – 1 असा पराभव केला. याचबरोबर कतार हा ग्रुप स्टेजमध्ये पहिले दोन सलग सामने गमावणारा पहिला यजमान संघ ठरला, पण त्यातल्या त्यात आनंदाची बाब म्हणजे कतारने इतिहासातील आपल्या पहिल्याच वर्ल्डकपमध्ये पहिल्या गोलची नोंद केली. बदली खेळाडू म्हणून आलेल्या मोहम्मद मुनतारीने 78 व्या मिनिटाला हेडद्वारे गोल करत कतारकडून वर्ल्डकपमध्ये पहिला गोल करणारा खेळाडू म्हणून मान मिळवला.

सेनेगलच्या बौलाए डियाला 41 व्या मिनिटाला कतारवर पहिला गोल डागला. हाफ टाईमपर्यंत कतारला या गोलची परतफेड करता आली नाही. दुसर्‍या हाफमध्ये सुरुवातीच्या तीन मिनिटांतच सेनेगलने करावर दुसरा गोल डागत आपली आघाडी 2 – 0 अशी वाढवली. हा दुसरा गोल फामाराने केला. कतारने आपला खेळ उंचावत सेनेगलच्या गोलपोस्टवर आक्रमक चढाया करण्यास सुरुवात केली. मात्र त्यांना यश येत नव्हते. अखेर 78 व्या मिनिटाला बदली खेळाडू मोहम्मद मुनतारीने हेडद्वारे कतारचा वर्ल्डकप इतिहासातील पहिला गोल केला. यानंतर 84 व्या मिनिटाला बामा डियांगने सेनेगलसाठी तिसरा गोल करत कतारचा पराभव निश्चित केला.

Back to top button