Deepak Chahar Injured : भारताला बसला आणखी एक धक्का, बुमराहनंतर ‘हा’ गोलंदाज जखमी | पुढारी

Deepak Chahar Injured : भारताला बसला आणखी एक धक्का, बुमराहनंतर 'हा' गोलंदाज जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० विश्वचषकाच्या पूर्वसंध्येला भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार वेगवान गोलंदाज दीपक चहरही जखमी झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वी झालेल्या प्रशिक्षण सत्रात दीपक चहरचा पाय घोट्यातून मुरगळला होता. यानंतर झालेला पहिला एकदिवसीय सामना दीपक चहर खेळू शकला नव्हता. दरम्यान पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला ९ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. (Deepak Chahar Injured)

दीपक चहर जखमी झाल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण यापूर्वीच भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे टी-२० विश्वचषकातून बाहेर पडले आहेत. बुमराह विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर त्याची उणीव दीपक चहर भरून काढेल, अशी आशा सर्वांना होती. मात्र, आता दीपक चहर जखमी झाला आहे. (Deepak Chahar Injured)

दरम्यान,  चहरचा पाय मुरगळला असला तरीही दुखापत गंभीर नाही. दीपक चहरला पुढील काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे चहरला विश्वचषकातील सामने खेळवण्याची जोखीम भारतीय संघ घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. कारण त्याचा समावेश संघातील राखीव खेळाडूंच्या यादीत करण्यात आला आहे. (Deepak Chahar Injured)

राखीव खेळाडूंमध्ये चहरचा समावेश (Deepak Chahar Injured)

वेगवान गोलंदाज दीपक चहरचा समावेश टी-२० विश्वचषकातील राखीव खेळाडूंमध्ये करण्यात आला होता. आशिया चषकातही चहरचा समावेश राखीव खेळाडूंमध्ये होता. मात्र, आवेश खान जखमी झाल्यानंतर त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत दीपक चहरने दमदार कामगिरी केली होती. (Deepak Chahar Injured)

हेही वाचलंत का?

Back to top button