पंकज अडवाणीचे दहावे विजेतेपद | पुढारी | पुढारी

पंकज अडवाणीचे दहावे विजेतेपद | पुढारी

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मनीषा-व्हॅस्कॉन बिलीयर्डस् व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत वरिष्ठ बिलीयर्डस् मुलांच्या गटात अंतिम फेरीत 23 वेळा जागतिक विजेतेपद पटकावणार्‍या पंकज अडवाणी याने माजी जागतिक स्पर्धेतील विजेत्या सौरव कोठारी याचा पराभव करून विजेतेपद पटकावत या गटात दहावेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकावण्याचा मान मिळवला.

या स्पर्धेत वरिष्ठ बिलीयर्डस् गटात अंतिम फेरीच्या लढतीत पंकज अडवाणी याने आपली विजयी मालिका कायम ठेवत सौरव कोठारीचा 5-2 (13-150 (131), 152 (95,57)-12, 151 (151)-00, (62) 62-150 (142), 150 (135)-45, 150 (94)-48, 150 (107)-02) असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. सामन्यात पहिल्या फ्रेममध्ये सौरव याने वर्चस्व राखले व ही फ्रेम पंकजविरुद्ध 150 (131)-13 अशी जिंकून आघाडी घेतली; पण त्यानंतर पंकज याने आपल्या अनुभवाचा उपयोग करीत दुसर्‍या फ्रेममध्ये 95 व 57 गुणांचा ब्रेक नोंदवून ही फ्रेम 152 (95, 57)-12 अशी जिंकून सामन्यात बरोबरी साधली.

पंकज याने आपला रंगतदार

खेळ सुरू ठेवत 151 गुणांचा ब्रेक नोंदवून तिसरी फ्रेम 151 (151)-00 अशी एकतर्फी जिंकून 2-1 अशा फरकाने आघाडी मिळवली. चौथ्या फ्रेममध्ये सौरव याने चतुराईने खेळ करीत पंकजविरुद्ध ही फ्रेम 150 (142)-62(62) अशी जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले; पण पंकजने जोरदार खेळ करीत पुढील तीनही फ्रेम सौरवविरुद्ध  150 (135)-45, 150 (94)-48, 150 (107)-02) अशा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले.  

स्पर्धेचे पारितोषिक वितरण बीएसएएमचे अध्यक्ष राजन खिंवसरा आणि व्हॅस्कॉनचे सिद्धार्थ वासुदेवन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बीएसएएमचे उपाध्यक्ष सौमिल करकेरा व सिद्धार्थ पारीख, बीएसएएमचे मानद सचिव ऋषभ कुमार व मानव पंचाल, खजिनदार शेखर सुर्वे, अमित सप्रू, मुख्य रेफ्री अजय रस्तोगी, सलील देशपांडे आणि राजवर्धन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Back to top button