बोपन्नाला दुहेरीत ‘वाईल्ड कार्ड’ | पुढारी | पुढारी

बोपन्नाला दुहेरीत ‘वाईल्ड कार्ड’ | पुढारी

पुणे  : पुढारी वृत्तसेवा

टाटा ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसर्‍या पर्वातील स्पर्धेसाठी भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि त्याचा साथीदार अर्जुन कढे यांना दुहेरीत ‘वाईल्ड कार्ड’द्वारे थेट प्रवेश देण्यात आला आहे. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर 3 ते 9 फेब्रुवारीदरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे.

गतवर्षीच्या मालिकेत जागतिक क्रमांक 38 असलेल्या रोहन बापन्ना याने दिविज शरणच्या साथीत दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. तसेच, यावर्षीदेखील दक्षिण आशियातील एटीपी टुर्स स्पर्धांपैकी एक असलेल्या या स्पर्धेत रोहन बोपन्ना पुण्याच्या अर्जुन कढेच्या साथीत खेळणार आहे. दिविज शरण आर्टेम सिटॅक या जोडीला मुख्य ड्रॉमध्ये थेट प्रवेश देण्यात आला आहे. याशिवाय अर्जुन कढेला एकेरीत आणि भारताचा उदयोन्मुख खेळाडू शशिकुमार मुकुंद याला ‘वाईल्ड कार्ड’ प्रदान करण्यात आले.

Back to top button