सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडला फक्त ऑस्ट्रेलियाच लागते? | पुढारी

सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडला फक्त ऑस्ट्रेलियाच लागते?

वेलिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला चौथा टी-२० सामनाही टाय झाला. त्यामुळे मालिकेतील सलग दुसरा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. भारताने सलग दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये सरस कामगिरी करत न्यूझीलंडला सलग दुसऱ्यांदा मात दिली. सालाबाद प्रमाणे सुपर ओव्हरने न्यूझीलंडसाठी अपशकून केला. गतवर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकातही न्यूझीलंडचा सुपर ओव्हरमध्ये घात झाला. त्यावेळी त्यांनी सुपर ओव्हरही टाय केली होती. पण, त्यावेळीच्या सर्वाधिक बाऊंडरीच्या नियमानुसार इंग्लंडला विजेतेपद मिळाले. त्यावेळी न्यूझीलंडबद्दल अनलकी संघ म्हणून सहानभूती मिळाली. ती रास्तच होती पण, न्यूझीलंडची ही सुपर ओव्हरची करुण कहाणी त्यावेळीपासूनची नाही. त्यांच्या या सुपर ओव्हरच्या करुण कहाणीत त्यांना फक्त ऑस्ट्रेलियानेच दया दाखवल्याचे आकडेवारीवरुन सिद्ध होते. 

वाचा : #SuperOver मेरी किस्मत में तू नहीं शायद, क्यूं तेरा इंतजार करता हूं

न्यूझीलंडची ही सुपर ओव्हरची करुण कहाणी सुरु होते ती २००८ पासून. त्यावेळी वेस्ट इंडिजने त्यांना सुपर ओव्हरमध्ये पाणी पाजले होते. त्यानंतर २०१० ला कांगारुंना त्यांची दया आली असावी त्यामुळे सुपर ओव्हरमधील आपला पहिला विजय साजरा केला. पण, हा आतापर्यंतचा त्यांचा हा एकमेव सुपर ओव्हरमधला दिलासा देणारा निकाल ठरला आहे. कारण आतापर्यंतच्या आठ सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यात त्यांना ७ वेळा पराभव स्विकारावा लागला आहे. 

Image

साभार आयसीसी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वहिल्या विजयानंतर किवींची सुपर ओव्हमधील पराभवाची मालिका सुरु झाली. ती आज (दि.३१) भारताविरुद्धच्या सामन्यातही कायम राहिली. २०१२ ला श्रीलंकेने त्यांना सुपर ओव्हरमध्ये किवींना मात दिली. तोच कित्ता वेस्ट इंडिजने २०१२ मध्येच त्याच व्हेन्यूवर म्हणजे पाल्लेकेलेवर गिरवला. त्यानंतर न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासातील प्रसिद्ध सुपर ओव्हर २०१९ च्या एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये झाली. यात जरी त्यांना मात मिळाली नसली तरी विजय आणि पर्यायाने वर्ल्डकपही मिळाला नाही. 

वाचा : नाद खुळा : सुपर ओव्हरमध्ये गुलाल आमचाच!

या पराभवानंतर न्यूझीलंडच्या सुपर ओव्हरच्या करुण कहाणीकडे सर्व जगाचे लक्ष वेधले गेले. त्याच वर्षी म्हणजे २०१९ ला वर्ल्डकपमधील सुपर ओव्हरची जखमेवर इंग्लंडने पुन्हा मीठ चोळले. त्यांनी किवींना मायदेशात ऑकलंडवर सुपर ओव्हरमधला पराभव दाखवला. श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड नंतर भारत तरी मागे का राहिल. भारतानेही २०२० मध्ये न्यूझीलंडला तुम्ही सुपर ओव्हरमध्ये फार कच्चे आहात हे एकदा नाही तर सलग दोन वेळा दाखवून दिले.

वाचा : NZvsIND : शमीनंतर आता शार्दुलची कमाल, सामना पुन्हा ‘टाय’

ज्याप्रमाणे दक्षिण आफ्रिका वर्ल्डकपमध्ये चोकर म्हणून ओळखली जाते. त्याप्रमाणे न्यूझीलंडही आता सुपर ओव्हरमधील चोकर झाली आहे असे म्हणावे लागेल. दक्षिण आफ्रिकेला आजपर्यंत हे चक्रव्यूह तोडता आलेले नाही. आता न्यूझीलंडही सुपर ओव्हरच्या बाबतीत हाच सिलसिला सुरु झाला आहे. 

 

Back to top button