जेमीसनमुळे वॅगनरचे पुनरागमन सापडले संकटात | पुढारी

जेमीसनमुळे वॅगनरचे पुनरागमन सापडले संकटात

वेलिंग्टन : वृत्तसंस्था

‘टीम इंडिया’चा न्यूझीलंड दौरा यजमान संघाचा युवा जलदगती गोलंदाज कायेल जेमीसनसाठी खूपच लाभदायक ठरत आहे. अगोदर त्याने एकदिवसीय मालिकेमध्ये सर्वांना प्रभावित केले आहे आणि त्यानंतर वेलिंग्टन कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शानदार गोलंदाजी करीत त्याने ‘टीम इंडिया’ला बॅकफूटवर ढकलण्यात मोलाचे योगदान दिले. परिणामी विराट कोहलीचा संघ त्यामधून सावरू शकला नाही. जेमीसनने आपल्या या प्रदर्शनाच्या जोरावर आपल्या संघ व्यवस्थापनाला पुढील कसोटीसाठी गोलंदाजाची निवड अवघड करून ठेवली आहे. 

6 फूट 8 इंच उंची असलेल्या या गोलंदाजाने आता न्यूझीलंडच्या संघात नील वॅगनरचे पुनरागमन अवघड करून टाकले आहे. जेमीसनला नील वॅगनरच्या जागी संघामध्ये संधी दिली होती. ती सार्थ ठरवत जेमीसनने या सामन्याच्या पहिल्या डावात 45 चेंडूंमध्ये 44 धावांची तुफानी खेळी केली आणि कोलिन- डी-ग्रँडहोमेच्या साथीने 71 धावांची भागीदारीही नोंदवली. या जोरावर यजमान संघाने 348 एवढी विशाल धावसंख्या उभारली. 

Back to top button