Shahrukh Khan : शाहरुख खानचा ‘नाईट रायटर्स’ संघ खेळणार युएई टी २० - पुढारी

Shahrukh Khan : शाहरुख खानचा ‘नाईट रायटर्स’ संघ खेळणार युएई टी २०

मुंबई : पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) ने संयुक्त अरब अमिराती (UAE T20 League) च्या आगामी T20 लीगमध्ये फ्रँचायझी मिळवली आहे. ही फ्रँचायझी अबू धाबीची असेल आणि तिचे नाव अबू धाबी नाईट रायडर्स असेल. इंडियन प्रीमियर लीग (IPL), कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) आणि मेजर क्रिकेट लीग (MLC) मध्ये आधीपासूनच T20 फ्रँचायझी असलेल्या नाईट रायडर्स ग्रुपची ही जगभरातील चौथी T20 फ्रँचायझी असेल.

अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) आणि तिचा पती जय मेहता यांच्या नाइट रायडर्स समुहाने 2008 साली आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) फ्रँचायझी विकत घेतली, त्यानंतर त्यांनी 2015 साली CPL मध्ये त्रिनबागो नाईट रायडर्सची मालकी मिळवली. अलीकडे, समुहाने यूएसमधील एमएलसीमध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यामध्ये समूह लॉस एंजेलिसमध्ये फ्रँचायझी तयार करू इच्छित आहे.

या प्रसंगी किंग खाननेही ट्विट करून आनंद व्यक्त केला. शाहरुखने ट्विट (Shahrukh Khan) केले की, “आम्ही संस्थेतील सर्वजण एका कुटुंबासारखे असल्यामुळे औपचारिकपणे बोलू इच्छित नाही, परंतु हे प्रत्यक्षात आणल्याबद्दल वेंकी म्हैसूर आणि त्यांचे सर्व सहकारी @KKRiders यांचे खूप खूप आभार. क्रिकेटसह नवनवीन क्षेत्रात पुढे येत राहा.’’

आयपीएल २०२२ चा हंगाम शाहरुख खानच्या केकेआरसाठी काहीसा निराशाजनक राहिला आहे. आयपीएलचा साखळी सामन्यांचा आत शेवटाचा टप्पा सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या 12 सामन्यांमध्ये केकेआरला फक्त 5 सामने जिंकता आले आहेत, तर 8 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

Back to top button