

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा मराठमोळा साज पाहायला मिळत आहे. शर्मिष्ठा राऊतचा एक सुंदर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शर्मिष्ठाने (sharmishtha raut) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटला एक व्हिडिओसह काही फोटो शेअर केले आहेत. निळ्या रंगाच्या नऊवारीमध्ये तिचं रुप खुललं आहे. कपाळी चंद्रकोर, नाकात नथ आणि निळ्या नऊवारील शोभेल असे लाल रंगाचे ब्लाऊज घातले आहे. साजशृंगार करून शर्मिष्ठाने आपला लूक पूर्ण केला आहे.
तिने आपल्या व्हिडिओला आली ठुमकत अशी कॅप्शन देत हार्ट इमोजी शेअर केलीय. ❤️, तर फोटो शेअर करताना नार नखऱ्याची…!♥️अशी कॅप्शन दिलीय. आणखी एका व्हिडिओमध्ये ती महिला गँगसोबत दिसतय. या गँगमध्ये तिच्यासोबत धनश्री कडगावकर, स्मिता शेवाळे, अमृता धोंगडे, रीना, गिरीजा प्रभू आहे. शिव ठाकरे हादेखील व्हिडिओमध्ये शेवटी दिसतो. तिच्या इन्स्टाला पाहिलं तर शर्मिष्ठाचे मराठमोळ्या लूकमधील खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज पाहायला मिळतात.
शर्मिष्ठाने मुलगी झाली हो या मालिकेत निलिमा सावंत ही व्यक्तीरेखा साकारलीय. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. 'बिग बॉस मराठी' या लोकप्रिय कार्यक्रमातून चर्चेत आलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये शर्मिष्ठाने काम केलं आहे. तिची लोकप्रियता प्रचंड आहे. सोशल मीडियावर ती ॲक्टिव्ह असून ती आपले अनेक अपडेट्स त्या माध्यमातून शेअर करत असते.