केशव महाराजची हॅट्ट्रिक | पुढारी | पुढारी

केशव महाराजची हॅट्ट्रिक | पुढारी

ग्रोस आईलेट : वृत्तसंस्था

केशव महाराजने हॅट्ट्रिकसह मिळवलेल्या पाच विकेटस्च्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाने दुसर्‍या कसोटीत विंडीजवर 158 धावांनी विजय मिळवत मालिका 2-0 अशी जिंकली. महाराज हॅट्ट्रिक घेणारा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा गोलंदाज ठरला. त्याने चौथ्या दिवशी उपहारापूर्वी कायरन पॉवेल, जेसन होल्डर आणि जोशूआ डा सिल्वा यांना सलग तीन चेंडूंवर बाद केले. यापूर्वी 1960 मध्ये लॉर्डस्मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ज्योफ ग्रिफीन यांनी कसोटीत हॅट्ट्रिक मिळवली. त्यापूर्वी कगिसो रबाडाने वरच्या फळीतील तीन फलंदाजांना बाद करत वेस्ट इंडिज संघावर दबाव निर्माण केला होता.

यानंतर महाराजने भेदक गोलंदाजी करत चहापानापूर्वीच वेस्ट इंडिज संघाला 165 धावसंख्येवर गारद केले. दक्षिण आफ्रिकेने त्यांच्यासमोर 324 धावांचे लक्ष्य ठेवले होते. विंडीजने बिनबाद 15 धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली; पण रबाडाने क्रेग ब्रेथवेट (6 धावा) आणि शाई होप (2 धावा) यांना बाद करत संघावर दबाव निर्माण केला. पॉवेल आणि काईल मायर्स (34 धावा) यांनी 64 धावांची भागीदारी केली; पण उपहारानंतर विंडीजचे खेळाडू ठराविक अंतराने बाद होत राहिले. दक्षिण आफ्रिकेचा मार्च 2017 नंतर विदेशात पहिला मालिका विजय आहे.

 

Back to top button