पुढारी ऑनलाईन डेस्क : दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार या दोन गोलंदाजांनी फलंदाजी केलेल्या अविश्वसनीय कामगिरीमुळे दुसर्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने श्रीलंकेवर 3 विकेटस्नी रोमहर्षक विजय मिळवला.
आघाडीचे सर्व फलंदाज बाद झाल्यानंतर भारतासाठी या सामन्यात विजय मिळवणे अशक्य वाटत असताना दीपक चहर हा श्रीलंकेवर कहर बनून कोसळला. त्याने आणि भुवनेश्वरने आठव्या विकेटस्साठी 84 धावांची भागीदारी करून टीम इंडियाला विजयी केले.
अधिक वाचा :
या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. चहरने 69 तर भुवनेश्वरने 19 धावा केल्या.
दीपक चहर आणि सूर्यकुमारच्या खेळीचे कौतुक…
या विजयानंतर टीम इंडियाच्या मेन टीमचा कर्णधार विराट कोहलीने ट्विट करत दीपक चहर आणि सूर्यकुमार यादवच्या खेळाचे कौतुक केले आहे. कोहलीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, खेळाडूंनी दिमाखदार विजय मिळवला. कठीण परिस्थितीत जिंकण्यापर्यंत पोहोचण्याचा अद्भूत प्रयत्न. सामना पहायला खूप मजा आली. दडपण असतानाही दीपक चहर आणि सूर्यकुमारची जबरदस्त खेळी!.
अविष्का फर्नांडो (50) आणि चरिथ असलंका (65) यांची अर्धशतके आणि चामिरा गुणरत्नेच्या नाबाद 44 धावांच्या जोरावर श्रीलंकेने 9 बाद 275 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अवस्था 7 बाद 193 अशी झाली होती; पण येथून पुढे दीपक चहर आणि भुवनेश्वरने अतुलनीय खेळी करीत विजय मिळवला.
अधिक वाचा :
भारताची सुरुवात खराब पण….
तत्पूर्वी, भारताच्या सूर्यकुमार यादवने कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावताना 44 चेंडूंत 53 धावा केल्या.
श्रीलंकेने दिलेल्या 276 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. पहिल्या सामन्यातील विजयाचे दोन शिल्पकार पृथ्वी शॉ (13) आणि इशान किशन (1) हे लवकर बाद झाले. शिखर धवन (29) याचा रंगत चाललेला खेळ वानिंदू हसरंगाने भंग केला.
यानंतर सूर्यकुमार यादवने मनीष पांडेच्या मदतीने भारताची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला; पण यादवच्या स्ट्रेट ड्राईव्हवर पांडे (37) दुर्दैवी धावचित झाला.
हार्दिक पंड्याला शून्यावर…
पाठोपाठ हार्दिक पंड्याला शून्यावर बाद करून श्रीलंकेने सामन्यावर पकड मिळवली; पण दुसर्या बाजूने यादव मात्र किल्ला लढवत होता, त्याने 42 चेंडूंत आपले पहिले अर्धशतक झळकावले.
मात्र, त्यानंतर तो लगेचच बाद झाला. यानंतर कृणाल पंड्या (35) ने थोडी फार झुंज देण्याचा प्रयत्न केला. परंतु, हसरंगाने त्याचा त्रिफळा उडवला. यावेळी भारताच्या पराभवाची फक्त औपचारिकताच उरली आहे, असे वाटत होते.
अधिक वाचा :
आणि विजयीध्वज फडकवला…
परंतु, दीपक चहर व भुवनेश्वरने हार न मानता किल्ला लढवत ठेवला आणि विजयीध्वज फडकवला. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगाने 3 विकेटस् घेतल्या.
तत्पूर्वी, कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेने पुन्हा नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
मिनोद भानुका आणि अविष्का फर्नांडो यांनी श्रीलंकेकडून डावाला सुरुवात केली. या दोघांनी दमदार सलामी देत आठव्या षटकांत संघाचे अर्धशतक फलकावर लावले.
वेगवान मारा निष्प्रभ ठरल्यानंतर मागच्या सामन्यात उत्तम गोलंदाजी कलेला फिरकीपटू युजर्वेंद्र चहल पुन्हा एकदा भारतासाठी धावून आला. त्याने मिनोद भानुकाला वैयक्तिक 36 धावांवर बाद करीत लंकेला पहिला धक्का दिला.
अधिक वाचा :
त्यानंतर याच षटकात चहलने भानुका राजपक्षेला शून्यावर बाद केले. इशान किशनने राजपक्षेचा झेल टिपला. त्यानंतर अविष्का फर्नांडोने धनंजय डिसिल्वासोबत भागीदारी करीत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो अर्धशतक केल्यानंतर माघारी परतला.
भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने त्याला हार्दिक पंड्याकरवी झेलबाद केले. फर्नांडोने 4 चौकार आणि एका षटकारासह 50 धावा केल्या.
दीपक चहरने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या धनंजय डिसिल्वाला कर्णधार धवनकरवी झेलबाद केले. डिसिल्वाने 32 धावांचे योगदान दिले. चहलने पुन्हा गोलंदाजीला येत श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाची दांडी गूल केली. शनाकाने 16 धावा केल्या.
येथून पुढे श्रीलंकेचा डाव लवकर गुंडाळला जाईल असे वाटत असताना चरिथ असलंका आणि चामिरा करुणारत्ने यांनी अर्धशतकी भागीदारी केल्याने लंकेच्या धावसंख्येला आकार आला.
अधिक वाचा :
असलंकाने आपले अर्धशतक झळकावले. तो 65 धावांवर बाद झाला. भुवनेश्वर कुमारने 50 व्या षटकात दुश्मंता चमिरा आणि लक्षण संदानकनला बाद केले.
दीपक चहरने 2 बळी टिपले…
लंकेचा तळाचा फलंदाज चमिका करुणारत्नेने धावांचे योगदान दिल्यामुळे लंकेला पावणेतीनशेचा टप्पा ओलांडता आला. शेवटच्या दोन चेंडूंवर करुणात्नेने दोन चौकार खेचले. करुणारत्नेने 5 चौकारांसह नाबाद 44 धावांची खेळी केली.
भारताकडून चहल आणि भुवनेश्वरला प्रत्येकी 3 बळी घेता आले. दीपक चहरने 2 बळी टिपले.
हे ही वाचा :