मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पॉर्न व्हिडिओ रॅकेट प्रकरणी राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पॉर्न व्हिडिओ रॅकेट प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीचा पती राज कुंद्राला आज सकाळी अटक करण्यात आली होती.
अधिक वाचा
वेबसिरीजमध्ये काम देण्याचे आमीष दाखवून तरुणींना आपल्या जाळ्यात ओढत त्यांच्या अश्लील चित्रफीती बनवून त्या वेबसाईट आणि अँपच्या माध्यमातून प्रसारीत केल्याच्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्रा याला सोमवारी रात्री अटक केली होती.
अधिक वाचा
त्याला मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने राज कुंद्रा याला पोलीस कोठडीचे आदेश दिले आहेत.
अश्लील फिल्म निर्मिती आणि त्यांच्या प्रदर्शनात राज कुंद्रा हा मुख्य सूत्रधार आहे. त्याने पॉर्नफिल्म आणि वेबसीरिज बनवण्यासाठी अर्थपुरवठा केला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पैशांची गुंतवणूक केली आहे.
एक पॉर्नफिल्म बनवण्यासाठी ५ ते ७ लाख रुपये खर्च येत होता. पुढे या माध्यमातून राज कुंद्रा याने कोट्यवधी रुपये कमावले आहेत.
व्हाट्स अँप ग्रुपच्या माध्यमातून हे रॅकेट चालवले जात होते. शूट केलेले हे व्हिडीओ विदेशात पाठविल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वेबसाईट आणि अँपवर अपलोड केले जात होते. हे जाळे विदेशात पसरले आहे.
राज कुंद्रा याची यापूर्वी अटक करण्यात आलेल्या अन्य आरोपींसोबत चौकशी करायची आहे, असा युक्तिवाद करत सरकारी वकिलांनी राज कुंद्रा याच्या कोठडीची मागणी न्यायालयात केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत राज कुंद्रा याला कोठडी सुनावली आहे.
राज कुंद्रा याच्या सोबत गुन्हे शाखेने रयान थार्प याला अटक केली आहे. त्यालाही न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.