rahul dravid यांनी चहरला असा संदेश पाठवला की भारताने सामनाच जिंकला | पुढारी

rahul dravid यांनी चहरला असा संदेश पाठवला की भारताने सामनाच जिंकला

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : भारतीय क्रिकेट संघाने काल झालेल्या चित्तथरारक सामन्यात श्रीलंकेला ३ विकेटने मात दिली. या झालेल्या सामन्याचा मानकरी दीपक चहर ठरला. त्याच्यासोबत भुवनेश्वर कुमारनेही त्याला चांगली साथ दिली. काल झालेल्या सामन्याचे कोच म्हणून rahul dravid यांनी काम पाहिले.

दरम्यान, भारतीय संघ हा सामना गमावतो की काय या चिंतेने rahul dravid शांत होते.

दरम्यान, rahul dravid यांनी दिपक चहरला जो काही कानमंत्र दिला यानंतर सामन्याचा नूरच पालटला.

भारतीय संघाची काल सुरूवात खराब झाल्याने १९३ धावांत ७ विकेट अशी अवस्था झाली होती.

अधिक वाचा : 

भाऊ राहुल चहरकडे सिक्रेट मेसेज

दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार यांनी १५ ओव्हरमध्ये ८ व्या विकेटसाठी ८४ धावांची नाबाद खेळी केली. भारताचा ४४ व्या ओव्हरमध्ये ७ विकेट २४१ धावा होत्या.

या दरम्यान कोच द्रविड चिंतेत दिसत होते. यावेळी भारतीय संघाला ६ ओव्हरमध्ये ३५ धावांची गरज होती.

राहुल द्रविड ड्रेसिंग रुममधून पळत बॉउंड्री लाईनच्या जवळ येऊन थांबले.

यावेळी द्रविड यांनी दीपक चहरचा लहान भाऊ राहुल चहरकडे सिक्रेट मेसेज देत दीपककडे पाठवला. हा खुलासा मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी दीपक चहरने केला.

अधिक वाचा :

राहुल सरांमुळेच मी या धावा केल्या

यावेळी चहर म्हणाला, राहुल सर मला प्रत्येक बॉल खेळून काढण्यास सांगत होते.

सरांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. त्यांनी माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवला आहे. माझ्यासाठी हा गेम चेंजर सामना होता.

मी भारत अ साठी काही चांगले डाव खेळले होते. यामुळे माझा आत्मविश्वास द्विगुणीत होता. यामुळे मी सामना हातात आणू शकतो असे मला वाटले.

द्रविड सरांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. मला आशा आहे देशासाठी असे चांगले खेळण्याचे स्वप्न मी पाहत आहे.

अधिक वाचा :

जेव्हा मी फलंदाजीला आलो होतो तेव्हा माझ्या मनात सामना जिंकण्यासाठीची एकच गोष्ट सुरू होती.

अशा परिस्थितीत मी प्रथमच फलंदाजी केली. आम्ही फक्त प्रत्येक चेंडूसाठी खेळत होतो.

ज्यावेळी आम्हाला जिंकण्यासाठी ५० धावा बाकी असताना मी चौकार आणि षटकार मारण्याचा निर्णय घेतला.

४३ व्या षटकात संदकनवर षटकार मारल्यानंतर मला लय सापडत गेल्याचे चहर म्हणाला.

हे ही वाचा :

हे हा पाहा 

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button