राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा सप्टेंबरमध्ये; शिक्षण विभागाची घोषणा | पुढारी

राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा सप्टेंबरमध्ये; शिक्षण विभागाची घोषणा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली शिक्षक पात्रता परीक्षा १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात होणार आहे. ही परीक्षा आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे.

गेल्या दोन वर्षात शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन केलेले नाही. २०१८-१९ नंतर आता ही परीक्षा होणार आहे.

यामुळे या परीक्षेला सुमारे दहा लाख विद्यार्थी नोंदणी करतील अशी अपेक्षा आहे. इयत्ता पहिली ते चौथी व पाचवी ते आठवी शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य आहे.

गुणवंत व कार्यक्षम शिक्षक घेण्यासाठी ही परीक्षेचा चांगला उपयोग शिक्षक भरतीत होत आहे असेही शिक्षण विभागाने म्हटले आहे.

अधिक वाचा :

ही परीक्षा उतीर्ण होवून गुणवत्तेनुसार आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असलेल्या रिक्त जागांच्या शिक्षक भरतीसाठी या परीक्षेचा मोठा फायदा होणार आहे.

गेल्या परीक्षेत तब्बल सात लाखाहून अधिक विद्यार्थी नोंदणी करत होते. यामुळे आता तीन दोन वर्षानी ही परीक्षा होत आहे.

२०१९ साली लोकसभा व विधानसभा निवडणुकांमुळे तर २०२० साली कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा झालेली नाही.

शालेय शिक्षण विभागाने नुकतीच ६ हजार १०० शिक्षकांची भरतीची घोषणा केली आहे. आता परीक्षा होणार असल्याने इच्छुंकांना शिक्षक नोकरीची संधी असणार आहे.

परीक्षेची तारीख जाहीर झाल्याने आनंद

शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख जाहीर झाल्याने आनंद होत आहे. शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा आवश्यक असते. जी महत्त्वाची देखील आहे. गेल्या दोन वर्षात शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन केलेले नाही. २०१८-१९ नंतर आता ही परीक्षा होणार आहे. परीक्षेची तयारी योग्य पद्धतीने केली आहे. परीक्षा कधी होते याची वाट पाहत आहे.
चेतन पाटील (विद्यार्थी)

अधिक वाचा :

 

Back to top button