sanjay raut संतापले; ‘ऑक्सिजन अभावी मृत्यू नाही हे धडधडीत खोटे’ | पुढारी

sanjay raut संतापले; ‘ऑक्सिजन अभावी मृत्यू नाही हे धडधडीत खोटे’

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन: देशात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही, असे सरकार धडधडीत खोटे बोलत आहे, असा आरोप खासदार sanjay raut यांनी केला.  हा ‘पेगासस’चा परिणाम असावा असा टोलाही त्‍यांनी लगावला.

अधिक वाचा:

करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी एकाचाही मृत्यू झाला नसल्याचे केंद्र सरकारने राज्यसभेत सांगितले आहे.

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यूच्या एकाही घटनेची नोंद झालेली नाही, अशी माहिती केंद्राकडून राज्यसभेत देण्यात आली आहे.

अधिक वाचा:

केंद्र सरकारच्या या निवेदनावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘बहुतेक हा पेगॅससचा परिणाम आहे’ असा टोलाही त्यांनी लगावला.

‘ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजनअभावी मरण पावले, जे ऑक्सिजनसाठी सिलिंडर्स घेऊन नातेवाईकांचा जीव वाचविण्यासाठी धावत होते, हे चित्र सर्वांनी पाहिले आहे. त्यावर तरी त्यांचा विश्वास बसतो का हे सांगायला हवे.

अधिक वाचा:

ऑक्सिजनअभावी अनेक राज्यांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे,’ असेही संजय राऊत म्हणाले.

‘उत्तर लेखी असो किंवा मौखिक; सरकार सत्यापासून पळत आहे. बहुतेक हा पेगॅससचा परिणाम आहे,’ असेही ते म्हणाले.

राज्यसभेत डॉ. भारती पवार काय म्हणाल्या?

दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या तीव्र कमतरतेमुळे रस्त्यावर आणि रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोविड -१९ रूग्णांचा मृत्यू झाला का? या काँग्रेसचे नेते के. सी. वेणूगोपाल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांनी उत्तर दिले.

‘आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे बाधितांची आकडेवारी आणि मृत्यूची संख्या केंद्राकडे नोंदवतात. त्यानुसार देशभरात कुठल्याही राज्यात ऑक्सिजनअभावी मृत्यूची नोंद झाली नाही.’

हेही वाचलेत का

Back to top button