porn film racket : राज कुंद्रा; कोण होतास तू, काय झालास तू? | पुढारी

porn film racket : राज कुंद्रा; कोण होतास तू, काय झालास तू?

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लंडनच्या ‘हॉटशॉट’ अ‍ॅपला पॉर्न फिल्म तयार करून विकल्याच्या आरोपाखाली प्रसिद्ध उद्योजक आणि सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अटक झाली. राज कुंद्रा याला वांद्रे न्यायालयाने 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

वेबसीरिजमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून तरुणींना आपल्या जाळ्यात ओढले जात होते. त्यांच्या अश्लील चित्रफिती बनवून त्या वेबसाईट आणि अ‍ॅपच्या माध्यमातून प्रसारित केल्याचा कुंद्रावर आरोप आहे.

अधिक वाचा :

  • राज कुंद्राचे वडील बस कंडक्टर होते. नंतर त्यांनी छोटा उद्योग सुरू केला. राजची आई त्यांना व्यवसायामध्ये मदत करू लागली.
  • ते लुधियानातून ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. राज कुंद्राचा जन्म लंडनमध्ये झाला.
  • राज कुंद्राने 18 व्या वर्षी कॉलेजला रामराम ठोकला.
  • 2004 मध्ये राज कुंद्रा ब्रिटनमधील 198 वी सर्वांत श्रीमंत व्यक्ती होते.
  • नेपाळमधून शाली विकत घेऊन त्या युरोपमध्ये विकण्याचा व्यवसाय सुरू केला, तेव्हापासून त्याची घोडदौड सुरू झाली.
  • कुंद्राने बेल्जियम आणि रशिया या देशांत हिर्‍यांचा व्यापार सुरू केला.
  • त्याने आर. के. कलेक्शन नावाची कंपनी सुरू केली. लंडनमध्ये महागडे कपडे विकण्याचा व्यवसाय चालू केला, यात त्याला प्रचंड पैसा मिळाला.
  • ब्रिटनमधील ट्रेड क्रॉप या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राज कुंद्राने काम केले होते.
  • कविता नावाच्या मुलीशी राजने लग्न केले. मात्र 2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या दोघांना डिलिना नावाची मुलगी आहे.
  • ‘बिग बॉस’च्या सेटवर 2007 मध्ये शिल्पा शेट्टीशी राजची पहिली भेट झाली. 22 नोव्हेंबर 2009 रोजी या दोघांनी लग्न केले.
  • 21 मे 2012 रोजी शिल्पा आणि राजला मुलगा झाला. विवान असे त्याचे नाव.
  • 2020 मध्ये या दाम्पत्याला मुलगी झाली. तिचे नाव समीक्षा असे ठेवण्यात आले.
  • 2009 मध्ये राज आणि शिल्पा यांनी आयपीएलमध्ये गुंतवणूक करत राजस्थान रॉयल्स संघाची भागीदारी घेतली.
  • 2012 मध्ये राजने संजय दत्तच्या सहकार्याने सुपरफाईट लीग सुरू केली होती.
  • 2013 मध्ये आयपीएलदरम्यान सट्टेबाजीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी राज कुंद्राची चौकशी केली होती. त्यानंतर राजस्थान रॉयल्सवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आणि राज कुंद्राही निलंबित झाला.
  • राज कुंद्राने ओटीटीमध्ये गुंतवणूक केली. बेस्ट डील असे या प्लॅटफॉर्मचे नाव होते. मात्र, काही काळानंतर हा उद्योग कायद्याच्या कचाट्यात सापडला.
  • 2018 मध्ये बिटकॉईन घोटाळ्यातही राज कुंद्राची ‘ईडी’कडून कसून चौकशी करण्यात आली होती. सुमारे दोन हजार कोटींचा हा घोटाळा होता.
  • 2019 मध्ये इक्बाल मिर्ची प्रकरणात राजला ‘ईडी’ने समन्स बजावले होते. राजने मिर्चीसोबत व्यावसायिक करार केल्याचा ‘ईडी’चा संशय होता.
  • ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून एका व्यापार्‍याला लाखो रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी राज कुंद्रासह शिल्पा शेट्टी आणि त्यांच्या इतर तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अधिक वाचा :

पहा व्हिडिओ : कोल्हापूर : सह्याद्रीतील अनोख्या हिरव्या बेडकाची गोष्ट

Back to top button