स्टाॅफनबर्ग : 'या' कमांडरने हिटलरच्या हत्येचं केलं होतं धाडस! | पुढारी

स्टाॅफनबर्ग : 'या' कमांडरने हिटलरच्या हत्येचं केलं होतं धाडस!

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टाॅफनबर्ग तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? तर, थडग्यावर डोकं ठेवून तो १८ वर्षांचा मुलगा रडत होता, “ये आईsss का सोडून गेलीस मला एकट्याला… तुला माहिती होतं ना मी तुझ्यावर किती प्रेम करतो ते… मी आता तुझ्याशिवाय कसं जगू… तू खूप दुःख सोसलंस… पण, मी तुला सुख देऊ शकलो नाही”, काळीज पिळवटून टाकणारा तो आकांत कब्रस्तानात जास्त घुमत होता. कोण होता हा रडणारा मुलगा? तर, हा धाय मोकलून रडणारा मुलगा २० व्या शतकात जगाला घाम फोडणारा होता.

ज्याचं नाव जरी उच्चारलं तरी इतिहास आजदेखील थरारतो. हो… हो… त्या मुलाचं नाव आहे एडाॅल्फ हिटलर. कुप्रसिद्ध हुकुमशहा. त्याच्या क्रूरपणाला कंटाळून त्याच्याच सैन्यातील एका कमांडरने त्याची हत्या करण्याचा कट रचला. पण, तो कट सक्सेस झाला नाही. तो सक्सेस झाला असता, तर आजता इतिहास काय वेगळा असता. चला, तर त्या कमांडरने केलेल्या हत्येचा कट उलगडून पाहू…

एडाॅल्फ हिटलर
६० लाख ज्युंची कत्तल करणारा एडाॅल्फ हिटलर.

जगाला माहिती आहे की, हिटलरमुळे जगाला दुसऱ्या महायुद्धाला सामोरं जावं लागलं. हिटलरला पहिल्या महायुद्धातील जर्मनीचा पराभव झोंबला होता. त्यानं पराभवाचं खापर जर्मनीतील ज्यूंवर फोडलं. कट्टर ज्यू विरोध, राष्ट्रभावनेला दिलेली चेतावणी आणि उत्कृष्ट वक्तृत्वशैली, यामुळे साधा शिपाई असणार हिटलर जर्मनीचा सर्वेसर्वा झाला. त्याची मुजोरी वाढत गेली. त्यानं लाखो ज्यूंच्या कत्तली केल्या. ही गोष्ट सर्वानांच पटणारी नव्हती. त्यामुळे हिटलरच्या सैन्यातच त्याचे विरोधक तयार झाले होते.

१९३३ मध्ये जर्मनीची सत्ता काबीज केल्यानंतर हिटलरनं खुली दडपशाही सुरू केली. त्यानं ६० लाख ज्युंची अक्षरश: कत्तल केली. १९३८ साली ऑस्ट्रियाला जबरदस्तीने जर्मनीमध्ये ओढून घेतले. १९३९ मध्ये पोलंडवर हल्ला केला. याच कारणांमुळे दुसरं महायुद्ध पेटलं. हिटलरवर त्याच्या सैन्याचा प्रचंड विश्वास होता. हिटलराही त्यांच्यावर विश्वास होता. हिटलरने फक्त आदेश द्यायचा आणि सैन्याने कसलाच विचार न करता तो आदेश पाळायचा. यामध्ये लाखो निरापराध ज्युंच्या कत्तली झाल्या.

पण, हिटरलचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. ही बाब हिटलरच्या सैन्यातील एका अधिकाऱ्याला माहीत होती. हिटलरची बेबंदशाही त्याला पटत नव्हती. तो सरळ सरळ जर्मनीच्या जनतेची फसवणूक करतो आहे, ही त्या अधिकाऱ्याच्या लक्षात आली होती. सुरुवातीला हा अधिकारी हिटलरचा कट्टर समर्थक होता. पण, नंतर त्याचा हिटलरवरून विश्वास उडाला. त्या अधिकाऱ्याचं नाव होतं क्लाॅज वाॅन स्टाॅफनबर्ग.

ए़डाॅल्फ हिटलर
बॉम्बचा स्फोट झाला तेव्हा हिटलरने हा ट्राऊजर घातला होता.

स्टाॅफनबर्ग हा १९ वर्षांचा असतानाच जर्मन सैन्यात भरती झाला होता. आपल्या शूरतेच्या बळावर त्यांने सैन्यामध्ये कमांडर पद मिळवले होते. महायुद्धात त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. उत्तर आफ्रिकेतील एका मोहिमेवर तो गेला होता. त्याच्याकडे शस्त्रास्त्र विभागाचे काम सोपविण्यात आले होते. १९४३ च्या युद्धात त्याने आपल्या डावा डोळा आणि डावा हात गमावला होता. त्यामुळे त्याला सैन्यातून निवृत्ती दिली होती.

स्टाॅफनबर्ग जखमी असल्यामुळे आपल्या विश्रांती घेत होता. याचवेळी त्याच्याकडे काही लोक हिटलरला मारण्याची योजना घेऊन आले. या लोकांचं असं म्हणणं होतं की, हिटलरची हत्या केली तर सोविएत संघ आणि पाश्चिमात्य लोकशाही राष्ट्र जर्मनीसोबत शांततेची चर्चा करायला तयार होतील. त्यांची ही योजना स्टाॅफनबर्गला पटली. जर हा प्रयोग फसला, तर हिटलर आपल्याला मारून टाकेल, याची जाणीव असतानाही स्टाॅफनबर्गने ही योजना स्वीकारली. अशा तऱ्हेने हिटलरच्या हत्येच्या कटाचं नाव ठेवण्यात आलं ‘ऑपरेशन वाल्केरी’.

स्टाॅफनबर्गने पुन्हा आपली पात्रता सिद्ध करत हिटरलच्या विश्वासू चमूमध्ये प्रवेश मिळवला. तेव्हा त्याला जर्मनीच्या रिप्लेसमेंट आर्मीच कमांडर हे पद देण्यात आलं. या पदामुळे स्टाॅफनबर्गला हिटलरच्या आसपास वावरण्याची संधी मिळाली. हिटलरची हत्या करण्याची तारीख ठरली २० जुलै १९४४. याच दिवशी वोल्फ्स लायर या मैदानावरील तळघरात हिटलरची गुप्त बैठक आयोजित करण्यात आली होती.

बाहेर प्रचंड उष्णता असल्यामुळे गर्मी जास्त होत होती. हिटलरने बैठकीच्या ठिकाणाचा निर्णय बदलला. त्याने तळघराऐवजी वरच्या मजल्यावरील एका खोलीत ही गुप्त बैठक घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हत्येचं नियोजन थोडंसं फसलं. स्टाॅफनबर्ग गोंधळला. पण, त्यातून सावरत त्याने पुढची तयारी लगेच केली. कारण, आज कोणत्याही परिस्थितीत हिटलरची हत्या करायीच, ही निर्धार स्टाॅफनबर्गने केलेला होता.

hitler
वोल्फ्स लायर या मैदानावरील वरच्या खोलीत झालेला बाॅम्बस्फोट

स्टाॅफनबर्गने बैठकीच्या खोलीत हिटलर ज्या खुर्चीवर बसणार होता, त्या खुर्चीखाली एक सुटकेस ठेवली. त्या सुटकेसमध्ये बाॅम्ब होता. तो सुटकेस ठेवून खोलीतून पसार झाला. पण, तो गेल्यानंतर हिटलरसोबत असलेल्या एका सैनिकाने ती सुटकेस थोडीशी बाजुला केली. त्यामुळे सुटकेचा मोठा स्फोट झाला. पण, त्यातून हिटलर बचावला. तो किरकोळ जखमी झाली. मात्र, त्या स्फोटामध्ये तीन सैनिकांचा मृत्यू झाला.

शेवटी व्हायचे तेच झाले. हिटलरने घटनेची सखोल चौकशी सुरु केली. त्यात स्टाॅफनबर्ग दोषी आढळला. ज्यांनी हत्येचा कट बनवला होता, त्यांनाही अटक करण्यात आली. सर्वांनाच हिटलरने क्रूरपणे गोळ्या झाडून ठार केले. स्टाॅफनबर्गचा प्रयोग फसला. जर तो प्रयोग सक्सेस झाला असता, तर कदाचित स्टाॅफनबर्ग हिरो असता आणि हिटलर व्हिलन तो व्हिलनच राहिला असता. आणि इतिहास स्टाॅफनबर्गची वाह… वाह… वाह करत असता.

पहा व्हिडीओ : सह्याद्रीतील हिरव्या बेडकाची अनोखी गोष्ट

Back to top button