Alejandra Rodríguez : अलेजांड्रा रॉड्रिग्जने वयाच्या ६० व्या वर्षी जिंकली Miss Universe Buenos Aires स्पर्धा | पुढारी

Alejandra Rodríguez : अलेजांड्रा रॉड्रिग्जने वयाच्या ६० व्या वर्षी जिंकली Miss Universe Buenos Aires स्पर्धा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अलेजांड्रा रॉड्रिग्ज यांनी वयाच्या ६० व्या वर्षी मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्सचा किताब जिंकला. अलेजांड्रा ही पेशाने वकील आणि पत्रकार आहे. (Alejandra Rodríguez) तिचे या स्पर्धेतील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Alejandra Rodríguez)

अर्जेंटिनाच्या ब्युनोस आयर्समधील प्लाटा येथे अलेजांड्रा रॉड्रिग्ज राहतात. त्यांनी वयाच्या साठव्या वर्षी हा किताब जिंकून वय आणि सौदर्यांची व्याख्या बदलली आहे. त्यांनी ही स्पर्धा जिंकून एक उत्तम उदाहरण स्थापित केलं आहे. एक्स अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये अलेजांड्रा ब्यूनस आयर्सचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज आहे, असं म्हटलं आहे.

मे महिन्याच्या २०२४ मध्ये नियोजित मिस युनिव्हर्स अर्जेंटिना राष्ट्रीय निवड होणार आहे. यामध्ये त्या जर निवडल्या गेल्या तर मेक्सिकोमध्ये होणाऱ्या (२८ सप्टेंबर, २०२४) मिस युनिव्हर्स वर्ल्ड स्पर्धेत भाग घेता येईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by @royalty.is.you

 

video – #missuniversebuenosaires instagram अकाऊंटवरून साभार

Back to top button