Mahesh Manjrekar : माझ्या कुटुंबीयांना बोलायचा हक्क कुणी दिला? संतापलेल्या महेश मांजरेकरांनी ट्रोलर्सना सुनावलं | पुढारी

Mahesh Manjrekar : माझ्या कुटुंबीयांना बोलायचा हक्क कुणी दिला? संतापलेल्या महेश मांजरेकरांनी ट्रोलर्सना सुनावलं

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेते, दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी त्यांच्या कुटुंबीयांवर टीका करणाऱ्या ट्रोलर्सना सुनावलं. माझे वडील, माझी मुलगी आणि पत्नी यांच्याबद्दल बोलायचा हक्क कुणाला देता येत नाही, असे मांजरेकर म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. (Mahesh Manjrekar)

महेश मांजरेकर यांनी सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगविषयी मुलाखतीत सांगितले की, त्यांनी एखादी पोस्ट सोशल मीडियावर केली की, ट्रोलर्सकडून टीका केली जाते. कधी कधी आक्षेपार्ह बोलले जाते. यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांबद्दलही बोललं जातं. यावर महेश मांजरेकर यांनी आपले मत व्यक्त केलं.

महेश मांजरेकर म्हणाले, मी बनवलेला चित्रपट आवडला नसेल तर त्याबद्दल बोला. पण माझी पत्नी,मुलगी, आई-वडील यांच्याविषयी बोलयचा हक्क तुम्हाला नाही.

ट्रोलिंग रोखण्यासाठी कायदा करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले.

ट्रोलिंगबाबत महेश मांजरेकर यांनी ट्रोलर्सवर तीव्र संताप व्यक्त करत म्हटले की, “मला या गोष्टीचा भयंकर राग येतो. का राग येऊ नये. कुणीतरी तुमच्या कुटुंबीयांवर बोलत राहतं. मी कुणाबद्दलही वैयक्तिक काही बोललो आहे का? मी एखादा चित्रपट बनवला की, तो तुम्ही पैस देऊन पाहता. त्यामुळे तिथे बोलण्याचा तुम्हा हक्क आहे. पैसे वसूल झाले किंवा पैसे वाया गेले. पण मी जेव्हा एखादी पोस्ट करतो तेव्हा माझ्या कुटुंबीयांवर बोलायचा हक्क तुम्हाला नाहीये. तुम्हाला कुणी हक्क दिला? माझी मलगी, पत्नी, आई यांच्याबद्दल बोलण्याचा! तुम्ही माझ्या कामावर टीका करता. पण मी तुम्चायबद्दल वैयक्तिक वाईट बोललो आहे का? माझ्या मुलीबद्दल आक्षेपार्ह लिहिलं गेलं होतं, त्याला शोधून काडून मी त्याच्याविरोधात तक्रार केली.

मग अशावेळी कसं दुर्लक्ष करायचं? त्यांना माफ करायचं का? हे सर्व तेव्हाच संपेल जेव्हा सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट करण्यासाठी कायदा तयार केला जाईल.”

Back to top button