Lok Sabha Election 2024: लोकसभा मतदानाच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात काँग्रेसचे ‘हे’ दिग्गज स्टार करणार प्रचार | पुढारी

Lok Sabha Election 2024: लोकसभा मतदानाच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात काँग्रेसचे 'हे' दिग्गज स्टार करणार प्रचार

पुढारी ऑनलाईन डेस्क: देशभरात लोकसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवार ७ मे रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. गृहमंत्री अमित शहांसह एनडीएचे अनेक दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. दरम्यान सोमवार २० मे रोजी महाराष्ट्रात लोकसभा मतदानाचा पाचवा आणि शेवटचा टप्पा पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने देखील महाराष्टातील दिग्गज स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. उर्वरित टप्प्यातील मतदानाच्या प्रचारासाठी ते महाराष्ट्रात येणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. (Lok Sabha Election 2024)

मंगळवारी ७ मे रोजी १२ राज्यात लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. यापूर्वी महाराष्ट्रात दोन टप्प्यातील मतदार प्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान सोमवार, १३ मे आणि सोमवार, २० मे या दोन टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, प्रियांका गांधी हे दिग्गज नेते महाराष्ट्रात प्रचारासाठी हजेरी लावणार असल्याचे पक्षाने निवदेनाद्वारे स्पष्ट केले आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही वाचा:

Back to top button