Ranveer Singh : रणवीर सिंह-‘जवान’ डायरेक्टर एटली तुफान थिरकले, लग्नातील डान्स व्हायरल | पुढारी

Ranveer Singh : रणवीर सिंह-'जवान' डायरेक्टर एटली तुफान थिरकले, लग्नातील डान्स व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहने तमिळ दिग्दर्शक शंकर यांची मुलगी ऐश्वर्या शंकरच्या लग्नात उपस्थिती लावली. लग्नसोहळ्यात रणवीरने ठुमके तर लगावले पण साऊथ दिग्दर्शक एटली यांनाही डान्स करायला भाग पाडले.  (Ranveer Singh )दोघांच्या डान्स मुव्ह्जने सर्वांना भूरळ घातली. एका व्हायरल व्हिडिओमध्ये दोघे थिरकताना दिसले. (Ranveer Singh )

ऐश्वर्या शंकरच्या लग्नात अनेक दिग्गज पोहोचले. लग्नानंतर झालेल्या संगीत नाईटमध्ये रणवीर सिंह आणि एटली ‘अप्पाडी पोडु’वर थिरकताना दिसले. यावेळी दिग्दर्शकाची मुलगी ऐश्वर्या आणि तिचे पती तरुण कार्तिकेयन देखील डान्समध्ये सहभागी होतात. चौघे स्टेजवर जबरदस्त डान्स करताना दिसले.

रणवीर सिंह – एटली थिरकले

याशिवाय, रणवीर – एटली यांना ‘वाकी कमिंग’ आणि शाहरुख खानचे प्रसिद्ध गाणे ‘लुंगी डान्स’वर ठुमके लगावले. शिवाय ‘तत्तड तत्तड’ गाण्यावरदेखील दोघे थिरकले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shankar (@director.shankar08)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shankar (@director.shankar08)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shankar (@director.shankar08)

Back to top button