‘द केरला स्टोरी’ने ‘पठाण’ला टाकले मागे | पुढारी

‘द केरला स्टोरी’ने ‘पठाण’ला टाकले मागे

‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरून सध्या वाद सुरू आहे. मात्र दुसरीकडे या वादाचा चित्रपटाला चांगलाच फायदा झाल्याचे दिसून येत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी जादुई आकडा गाठत 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली. अनेक राज्यांत या चित्रपटावर बंदी असूनही बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची पसंती मिळाल्याने, काही दिवसांतच ‘द केरला स्टोरी’ने 100 कोटींचा गल्ला जमवला आहे.

चित्रपटाने अवघ्या 9 दिवसांत 112.99 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह-जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचे कसे धर्मांतर करण्यात आले या कथेवर हा संपूर्ण चित्रपट आधारलेला आहे, असा दावा चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला होता. यामुळे देशभरात या चित्रपटावरून वाद सुरू झाला होता, तर काहींनी चित्रपटाचे कौतुकही केले. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘पठाण’चेही काही रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. आता ‘द केरला स्टोरी’ची घोडदौड 150 कोटींच्या दिशेने सुरू झाली आहे.

Back to top button