स्वतःला खूप सुधारले | पुढारी

स्वतःला खूप सुधारले

अभिनेत्री गिल हिने स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले; पण शहनाज हिने धैर्याने सर्व संकटांवर मात केली आहे. पण, आता शहनाजने तिच्या परफेक्ट फिगरने सर्वांना बुचाकले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तिच्यात अनेक बदल झाले आहेत. शहनाज तिच्या लूकमुळे कायम चर्चेत असते, शिवाय अभिनेता सलमान खान किसी का भाई किसी की जान चित्रपटातून शहनाजने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. किसी का भाई किसी की जान प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. नुकताच एका मुलाखतीत शहनाज म्हणाली, ‘मी स्वतःला प्रचंड बदलले आहे. मला ज्यांनी चांगले सल्ले दिले, त्यानुसार मी काम केले आणि स्वतःला सुधारले. मी | वजन कमी केलं, कारण ‘बिग बॉस’मध्ये माझ्यावर बॉडी शेमिंग सारख्या कमेंट करण्यात आल्या होत्या. | लोकांची समज मी बदलली आहे. अनेकांना वाटायचे की मी फक्त सलवार सूट घालू शकते पण आता मी | पुढे जात आहे.

Back to top button