सुश्मिता सेन आधीपासून खूप फिट | पुढारी

सुश्मिता सेन आधीपासून खूप फिट

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री सुश्मिता सेन हिला २७ फेब्रुवारीला शूटिंग सेटवर हृदयविकाराचा झटका आला होता. तिला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर तिच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, सुश्मिता योग्य वेळी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. त्यामुळे तिचा जीव वाचला.

डॉक्टर म्हणतात की, ती आधीपासून खूप फिट आहे. त्यामुळे तिच्या हृदयाचे कमीत कमी नुकसान झाले. पण सोबतच डॉक्टरांच्या मते, कोणत्याही व्यक्तीने जास्त व्यायाम करू नये. कारण यामुळे शरीराला रिकव्हर होण्याची संधी मिळत नाही. सुश्मितावर उपचार करणारे कार्डिओलॉजिस्ट डॉ. राजीव भागवत म्हणाले, सुश्मिताच्या हाय फिजिकल हालचालींमुळे तिच्या हृदयाचे आणखी नुकसान झाले नाही.

Back to top button