Rani Mukerji : राणी मुखर्जी झाली हैराण! | पुढारी

Rani Mukerji : राणी मुखर्जी झाली हैराण!

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री राणी मुखर्जी ( Rani Mukerji ) बॉलिवूडपासून दूर असली तरी ती नेहमीच चर्चेत असते. राणी तिच्या सिनेमांमुळे तर कायम चर्चेत राहिली, पण बेधडक वक्तव्यांमुळेही राणी अनेकता चर्चेत आली. एकदा राणीला विचारण्यात आले की, अशी एक गोष्ट जी केवळ करीना कपूरकडे नाही, पण तुझ्याकडे आहे? यावर राणीने कोणताच विचार न करता अभिनेता शाहीद कपूरचे नाव घेतले. कारण एक काळ असा होता, जेव्हा करीना आणि शाहीद यांच्या नात्याची जोरदार चर्चा रंगली होती.

एका मुलाखतीत राणी हिला विचारण्यात आले की, तुझ्याकडे असे काय आहे, जे करीनाकडे नाही? याप्रश्नाचं उत्तर देताना राणी विचार करत राहिली. याचवेळी करिनालाच हाच प्रश्न विचारल्यानंतर करीना म्हणाली, यश चोप्रा ! करीनाने दिलेले उत्तर ऐकून राणीही हैराण झाली. राणी आणि करीना दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण या टॉक शोमध्ये पोहोचल्या होत्या, त्यावेळी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल प्रचंड चर्चा रंगल्या.

Back to top button