Jharkhand ED raids | झारखंडमध्ये मंत्र्याच्या खासगी सचिवाच्या नोकराच्या घरात सापडलं ३० कोटींचं घबाड? नोटा मोजायला मशीन मागवलं | पुढारी

Jharkhand ED raids | झारखंडमध्ये मंत्र्याच्या खासगी सचिवाच्या नोकराच्या घरात सापडलं ३० कोटींचं घबाड? नोटा मोजायला मशीन मागवलं

पुढारी ऑनलाईन डेस्क : सक्तवसुली संचालनालयाने (ED) सोमवारी झारखंडमधील (Jharkhand) रांची येथील अनेक ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली. येथील ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव (PS) संजीव लाल यांच्या नोकराच्या घरातून ईडीने मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली. ही रक्कम २० ते ३० कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ही रक्कम इतकी मोठी आहे की ती मोजण्यासाठी मशीन मागवले आहे.

ED ने झारखंडमधील ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र के. राम यांना फेब्रुवारी २०२३ मध्ये काही योजनांच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती.

अधिक माहितीनुसार, झारखंडमधील मंत्र्याचे खासगी सचिव संजीव लाल याच्या नोकराचे नाव जहांगीर असे आहे. त्याचा पगार केवळ १५ हजार रुपये आहे. पण जहांगीरच्या घरात मोठ्या प्रमाणात रोकड सापडली आहे. त्याच्या घरातून सोने जप्त करण्यात आले आहे. रोकड मोजण्यासाठी मशीन मागवले आहे. रोकड मोजल्यानंतर ती नेमकी किती आहे हे स्पष्ट होईल.

या प्रकरणाचे कनेक्शन झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि चंपाई सोरेन यांच्या सरकारमधील मंत्री आलमगीर आलम यांच्याशी आहे. त्यांचे खासगी सचिव संजीय लाल यांच्या नोकराच्या घरातून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.

आलमगीर आलम कोण आहेत?

आलमगीर आलम (Alamgir Alam)  हे झारखंड सरकारमध्ये ग्रामीण विकास मंत्री आहेत. ते झारखंड मुक्ती मोर्चाचे वरिष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. ते २००६ ते २००९ दरम्यान विधानसभा अध्यक्षदेखील होते. ते पहिल्यांदा २००० मध्ये आमदार बनले होते. ते याआधी हेमंत सोरेन सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. पण त्यांच्या खासगी सचिवाच्या नोकराच्या घरात मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

Back to top button