Kashmera Shah : नशा करून मी असे वागत नाही! | पुढारी

Kashmera Shah : नशा करून मी असे वागत नाही!

पुढारी ऑनलाईन : कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी अभिनेत्री कश्मीरा शाह नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी कृष्णा आणि कश्मीराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका पार्टीत दोघे पोहोचले होते. यावेळी बिग बॉस- १६ फेम प्रियांका चौधरीही होती.

पार्टीमधून बाहेर पडताना कश्मीराने कृष्णाला किस केले; पण त्याचबरोबरीने तिने प्रियांकालाही किस केले. यावरूनच कश्मीराला ट्रोल करण्यात आले होते. याबाबत ती म्हणाली, ‘हा, मला माहीत आहे, लोकांना असे वाटले की, मी खूप नशेत आहे. मला नीट उभेही राहता येत नव्हते, असेही काही लोकांना वाटले. नशा करून मी असे वागत आहे, असे बोलले गेले. पण यामागे कारण काही वेगळेच होते. मी लांबचा प्रवास करून आले होते. मी अमेरिकेमधून आले होते. प्रवासामधून मी घरी आले, त्यानंतर लगेचच मी पार्टीला गेले. माझ्या हातात वाईनचा ग्लासही होता, त्यामुळे कदाचित माझं वागणं बदललं असेल.’

Back to top button