सिद्धार्थ-कियाराचा रॉयल लूक | पुढारी

सिद्धार्थ-कियाराचा रॉयल लूक

कियारा अडवाणीचा लेहंगा तयार करण्यासाठी चार हजार तास लागले असल्याचे फॅशन डिझायनर नीष मल्होत्रा याने सांगितले आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या संगीत कार्यक्रमातील फोटो समोर आले आहेत. या दोघांचा रॉयल लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे. बॉलीवूडमधल्या या लोकप्रिय जोडीने नुकतीच लग्नगाठ बांधली. आता कियारा-सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर संगीत कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. या कार्यक्रमातील दोघांच्या शाही पोशाखाने पुन्हा एकदा नेटकर्‍यांचे लक्ष वेधले आहे. कियाराने गोल्डन लेहंगा घातला आहे तर काळ्या रंगाच्या शेरवानीत सिद्धार्थ खूप हँडसम दिसत आहे. कियाराच्या या लेहंग्यावर जवळपास 98 हजार स्पार्कलिंग स्वारोस्की क्रिस्टल्स लावलेले आहेत. या लूकला साजेशा ज्वेलरीची निवड तिने केली आहे. यामध्ये नॅच्युरल डायमंडसह खास रुबीसुद्धा जडलेला आहे. सिद्धार्थची शेरवानीसुद्धा खास आहे. त्यावर बारकाईने थ—ेड वर्क करण्यात आला आहे. वेलवेट शेरवानीवर महागडे स्वारोस्की क्रिस्टल्स लावण्यात आले आहेत.

Back to top button